मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पुजाऱ्याला वाचण्यासाठी पुराच्या पाण्यात उतरला वाहतूक पोलीस, पाहा पुढे काय घडलं, VIDEO

पुजाऱ्याला वाचण्यासाठी पुराच्या पाण्यात उतरला वाहतूक पोलीस, पाहा पुढे काय घडलं, VIDEO

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक पुजारी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. ते मदतीसाठी ओरडत आहेत

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 नोव्हेंबर : दक्षिण भारतातील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सध्या पावसाने हाहाकार माजवला (Heavy Rain in Andhra Pradesh) आहे. तिरुपतिचे जे फोटो समोर आले आहेत, त्यात दिसतं की अनेक भाविक महापुरात (Flood) अडकले आहेत. घाट रोड आणि तिरुमाला हिल्सचे रस्तेही बंद आहेत. या भयंकर परिस्थितीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. याच ठिकाणचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. भयंकर परिस्थितही हा व्हिडिओ मन जिंकणारा आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक पुजारी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. ते मदतीसाठी ओरडत आहेत. इतक्यात तिथे ड्यूटीवर असलेल्या CI Sri Nayak हे त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. दोरीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून ते पुजाऱ्याजवळ पोहोचले आणि आपल्या जीवाची पर्वाही न करता पुजाऱ्याचा जीव वाचवला.

आंध्र प्रदेश पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन बचावकार्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ सहा हजारहून अधिकांनी पाहिला आहे. सोशल मीडिया यूजर्स या वाहतूक पोलिसाचं भरपूर कौतुक करत आहेत.

लोकांनी या पोलिसावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की पोलिसाची हिंमत कौतुकास्पद आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, पोलिसांच्या या गुणाबद्दल कोणीच बोलत नाही. अशा शूर पोलिसाला सॅल्यूट. आणखी एकाने कमेंट करत म्हटलं की यांना तर पुरस्कार मिळायला हवा. हा व्हिडिओ अनेकांनी लाईकही केला आहे.

First published:

Tags: Rain flood, Video Viral On Social Media