ठाणे. 09 जानेवारी : 'धावत्या रेल्वेत चढू नका', अशी सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून केली जात असते. पण तरीही प्रवाशी नको ते धाडस करून स्वत: चा जीव धोक्यात घालतात. ठाणे रेल्वे स्थानकावर (Thane Railway Station) धावत्या रेल्वेतून उतरण्याचा महिला प्रवाशाने प्रयत्न केला असता तोल जाऊन खाली कोसळली, वेळीच उपस्थितीत पोलिसांनी या महिलेचा जीव वाचवला.
शनिवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थानकांवर 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर महानगरी एक्स्प्रेस गाडी आली या गाडीतून एकाने महिलेने धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेचा तोल जाऊन ती रेल्वे प्लॅटफाॅर्मवर पडली.
रेल्वेगाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये ही महिला सापडणार होती, इतक्यात तिथे उभे असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पवार आणि अब्दुल सत्तार या दोघांनी त्या महिलेला पाहिलं आणि महिला रेल्वेच्या खाली जाण्याआधीच दोघांनी तिला पकडून बाहेर खेचले. त्यामुळे तिचा जीव वाचला. धनवंती राजू भारद्वाज आहे. सध्या ती मुंबईमध्ये एका कामानिमित्त आली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पवार आणि अब्दुल सत्तार यांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा जीव वाचला आहे. त्यामुळे या दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होतोय. वारंवार रेल्वेस्थानकावर अशा घटना घडत आहेत. प्रवासी गाडीमध्ये लवकर चढण्याच्या घाईत किंवा गाडीतून उतरण्याच्या घाईत असताना त्यांचा गाडीतून तोल जातो आणि ते रेल्वे प्लेटफाॅर्मवर पडतात. अनेक वेळा रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी प्रवाशांचा जीव वाचलेला आहे. त्यामुळे वारंवार सांगून देखील गाडी धावत गाडीमधून कोणीही उतरू नये किंवा धावती गाडी कोणीही पकडू नये,असं आवाहन पोलिसांनी केले आहे.
रेल्वे पोलीस नितीन पवार आणि अब्दुल सत्तार यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याचबरोबरीने रेल्वे विभागाने या दोघांच्या कौतुक करून त्यांचा सत्कार केलेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.