Home /News /viral /

पोलीस अधिकाऱ्याला शिक्षिकेनं दिले 1100 रूपये! भावुक प्रसंगाचा VIDEO VIRAL

पोलीस अधिकाऱ्याला शिक्षिकेनं दिले 1100 रूपये! भावुक प्रसंगाचा VIDEO VIRAL

शिक्षिका बोलत असताना त्यांच्या हातात काही पैसे दिसत आहेत. त्यांचं बोलून झाल्यानंतर वर्दीतला तरुण शिक्षिकेच्या पाया पडतो, त्यानंतर शिक्षिका हातातले पैसे या तरुणाला बक्षीस म्हणून देतात.

    मुंबई, 19 मे : शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी आयुष्यात कुठेही असले, कितीही यशस्वी झाले तरी त्यांच्यामध्ये शाळेत पुन्हा जाण्याची त्यांना ओढ असते. शाळेतील मित्र-मैत्रिणी, आवडीचे शिक्षक, शाळेतील गमती या सर्व त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. अनेक विद्यार्थी चांगली नोकरी मिळाल्यावर किंवा व्यवसायात यश मिळाल्यानंतर आपल्या शाळेमध्ये आवर्जुन जातात, शिक्षकांची भेट घेतात. शिक्षकांसाठी असे क्षण फार अभिमानाचे आणि कौतुकाचे असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलीस (Police) अधिकारी झालेल्या एका तरुणाने आपल्या शाळेला भेट दिल्यानंतर काय घडलं, हे पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलिसांचा गणवेश घातलेला एक तरुण शाळेच्या वर्गात उभा आहे. पोलीस अधिकारी झाल्यानंतर हा तरुण त्याच्या शाळेत भेट द्यायला आला आहे आणि त्याला पाहून सर्वजण खूप खूश होतात. त्या सर्वांपैकी सर्वांत जास्त आनंद शाळेतील एका शिक्षिकेला (Teacher) झाल्याचं दिसतंय. ती शिक्षिका त्या तरुणाची ओळख वर्गातील विद्यार्थ्यांची करून देते. तसंच त्या मुलाचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा, असंही सांगते. 'झी न्यूज' नं वृत्त दिलं आहे. पुढे शिक्षिका म्हणते, ‘या मुलाने फक्त देशाचंच नाही तर त्याच्या आई-वडिलांचं आणि समाजाचंही नाव उज्ज्वल केलंय. तुम्ही सर्वांनी त्याचा आदर्श घ्या आणि त्याच्यासारखे बना. तुम्हीही मोठी व्यक्ती व्हाल आणि तुम्हालाही योग्य सन्मान मिळेल.’ शिक्षिका बोलत असताना त्यांच्या हातात काही पैसे दिसत आहेत. त्यांचं बोलून झाल्यानंतर वर्दीतला तरुण शिक्षिकेच्या पाया पडतो, त्यानंतर शिक्षिका हातातले पैसे या तरुणाला बक्षीस म्हणून देतात. शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्याला 1100 रुपये बक्षीस म्हणून दिल्याचं कळतंय. यावेळी तरुण आणि शिक्षिका खूप खूश दिसत आहेत. तर वर्गात उपस्थित मुलं टाळ्या वाजवू लागतात. शाळेच्या गेटसमोरच शाळकरी मुलींची तुंबळ हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral फेसबुकवर (Facebook) व्हायरल झालेला हा व्हिडिओ सुनील बोरा सर नावाच्या अकाउंटवरून शेअर केला असून तो चांगलात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक युझर भावुक झाले आहेत. त्यांनी या तरुणाचं अभिनंदन करताना दिसत आहेत. तर एका यूजरने 'आयुष्यात गुरूचं स्थान सर्वोच्च आहे,' असं म्हटलंय.
    First published:

    Tags: School, Video viral

    पुढील बातम्या