बीजिंग, 12 डिसेंबर : कोरोना काळात पोलीस अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी खूप मदत केली आहे. अनेकदा खाकी वर्दीतले अधिकारी छोट्या गोष्टींसाठी देखील मदतीचा हात पुढे करताना दिसतात. एक पोलीस अधिकाऱ्यानं महिलेची नुसती मदतच केली नाही तर तिला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची मानणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ खूप भावुक करणारा आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक होत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की वृद्ध असलेल्या महिलेला रस्ता क्रॉस करण्यात अडथळा येत होता. चालताना अडखळत होती. दोन्ही बाजूनं वेगात गाड्या जात असताना वृद्ध महिला मध्येच अडखळली. हे पोलीस अधिकाऱ्यानं पाहिलं आणि तिची मदत करण्यासाठी पुढे सरसावला. या पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या पाठीवर या महिलेला घेतलं आणि रस्ता क्रॉस केला.
#EverydayHero Check out the video of a heartwarming scene of an auxiliary police officer bending down to carry an old lady across the street during morning rush hour on a winter day in Wuxi! Give the young man a thumbs-up! pic.twitter.com/kGp9utWklk
चायना डेलीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 1 मिनिट 3 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये आजही माणुसकी जिवंत आहे याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळतं. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ चीनमधील असल्याचं सांगितलं जात आहे. रस्ता ओलांडणाऱ्या वयस्कर महिलेला पोलिस अधिकारी आपल्या पाठीवरून घेऊन रस्ता ओलांडत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आतापर्यंत हा व्हिडीओ 5 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 255 जणांना लाईक तर 13 युझर्सनी कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याचं युझर्सनी तुफान कौतुक देखील केलं आहे.