एक लेब्राडोर डॉग अन् दोन मालक! खरा मालक शोधण्यासाठी पोलीसांनी केली श्वानाची DNA टेस्ट

एक लेब्राडोर डॉग अन् दोन मालक! खरा मालक शोधण्यासाठी पोलीसांनी केली श्वानाची DNA टेस्ट

दोन्ही मालकांनी लेब्रा डॉग दत्तक घेण्याबाबत पोलिसांना अनेक कागदपत्रे दिली मात्र तरी हे प्रकरण काही मिटले नाही.

  • Share this:

होशंगाबाद, 21 नोव्हेंबर : श्वान हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र मानला जातो, कारण श्वान हा विश्वासू पाळीव प्राणी आहे. मात्र मध्य प्रदेशातील होशंगाबाद एका लेब्रा डॉगवर दोन जणांनी मालकी हक्क सांगितल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी रात्री त्या श्वानालाच पोलीस ठाण्यात बोलावले. त्यानंतर दोन्ही मालकांनी लेब्रा डॉग दत्तक घेण्याबाबत पोलिसांना अनेक कागदपत्रे दिली मात्र तरी हे प्रकरण काही मिटले नाही. अखेर रात्री पोलिसांनी पशुवैद्यकीय रुग्णालयाला पत्र लिहून श्वानाच्या डीएनएचे नमुने घेतले.

रात्री 9 वाजेच्या सुमारास पशुवैद्यकीय रुग्णालय उघडण्यात आले आणि लेब्रा डॉगच्या डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुना घेण्यात आला. शनिवारी दोन्ही मालकांच्याही रक्ताचे नमुनेही घेण्यात आले. सध्या या नमुन्यांची तपासणी केली जात आहे, त्यानंतर पोलीस निर्णय घेतील.

वाचा-लपून-छपून उसाच्या शेतावर हत्तीचं पिल्लू मारत होतं ताव, व्यक्तीनं पाहिलं आणि...

श्वानाची झाली डीएनए टेस्ट

पोलिसांकडे लेब्रा डॉग कार्तिक शिवरे नावाच्या व्यक्तीच्या घरात कैद असल्याची तक्रार सहदेव खान या युवकाने केली होती. त्यानंतर पोलिसांनी श्वानाला पोलीस ठाण्यात आणले, आणि दोन्ही मालकांचा जबाब नोंदवला.

वाचा-प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या महिलेला दिला धक्का, समोरून आली मेट्रो आणि...

यानंतर या दोघांनी पोलिसांना वेगवेगळी कागदपत्रे दिली. सहदेव खान यांचे म्हणणे आहे की,त्यांनी लेब्रा डॉग खरेदी केली होता, त्याचे नाव कोको ठेवले होते. दरम्यान, आता डीएनए टेस्ट केल्यानंतर आता पोलीस याबाबत निर्णय घेतील.

Published by: Priyanka Gawde
First published: November 21, 2020, 2:45 PM IST

ताज्या बातम्या