जकार्ता, 31 डिसेंबर : आरोपीकडून गुन्हा कबुल करुन घेण्यासाठी पोलीस विविध प्रकारच्या पर्यायांचा अवलंब करतात. मात्र इंडोनेशियाच्या (Indonesia) पोलिसांनी एका आरोपीकडून त्याचा गुन्हा कबुल करण्यासाठी ज्या प्रकाराचा वापर केला त्याबाबत आपण कधी ऐकलेही नसेल. कारण पोलिसांनी ज्या पद्धतीचा अवलंब केला तो स्वत: एक गुन्ह्याहून कमी नाही. त्यामुळे जगभरात यावर टीका केली जात आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की पोलीस स्टेशनमध्ये एक आरोपी बसला आहे.
त्याच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत आणि त्याच्या गळ्याभोवती तब्बल 2 मीटर लांबीचा साप टाकण्यात आला आहे. त्यानंतर त्याला पोलीस चौकीत आणण्यात आले. व्यक्ती थरथरत होता आणि मोठमोठ्याने ओरडत होता. मात्र पोलिसांवर याचा काहीही परिणाम झाला नाही. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, सापाला पकडून वारंवार आरोपीच्या चेहऱ्याजवळ घेऊन गेले जात आहे.
तब्बल दीड मिनिटांच्या या व्हिडीओत एक साप या व्यक्तीच्या गळ्याभोवती आहे. या व्यक्तीचे हात कमरेवर मागच्या बाजूला बेड्यांनी बांधलेले आहे. आणि साप सातत्याने त्याच्या शरीरावर फिरत आहे. इतकच नाही एक व्यक्ती जो वारंवार चोराच्या चेहऱ्याजवळ साप घेऊन जात आहे. जो व्यक्ती त्याला सातत्याने मोबाइल किती वेळा चोरी केला? असा प्रश्न विचारत आहे. यावर आरोपी केवळ दोन वेळा असं उत्तर देत आहे.
Indonesian police were filmed using a two-metre long snake to interrogate a cable-tied suspect in Papua. pic.twitter.com/DfQuMrdvqr
— SBS News (@SBSNews) February 11, 2019
स्थानिक पोलिसांच्या प्रमुखांनी सांगितलं की, पोलिसांनी अशी वागणूक देणं अत्यंत चुकीचं आहे. ते म्हणाले की, आम्ही संबंधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली आहे. पोलीस प्रमुख आपल्या सहकाऱ्याचा बचाव करीत म्हणाले की, हा साप पाळीव होता आणि विषारी नव्हता. मात्र साप कोणत्या प्रजातीचा होता हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.
पोलीस प्रमुखांनी हे मान्य केले की, स्थानिक पोलिसांनी गुन्हा कबुल करण्यासाठी जारी केलेली ही पद्धत स्वत: निर्माण केली होती आणि संशयित आपला गुन्हा लवकरात लवकर कबुल करावा हा यामागील प्रयत्न होता. यासोबतच मानवाधिकार कार्यकर्त्या वेरोनिका कोमान यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी पोलिसांनी केलेल्या या कृत्याचा निषेध केला आहे.