Home /News /viral /

धक्कादायक! ऑन ड्युटी शिपायानं बार गर्लवर पैसे उडवत स्टेवर लगावले ठुमके

धक्कादायक! ऑन ड्युटी शिपायानं बार गर्लवर पैसे उडवत स्टेवर लगावले ठुमके

एका स्टेज शो दरम्यान पोलीस शिपायाला मोह आवरला नाही. त्याने स्टेजवर डान्स करणाऱ्या महिलेवर पैसे उधळत ठुमके लगावले आहेत.

    उन्नाव, 08 नोव्हेंबर : एका स्टेज शो दरम्यान शिपायाला मोह आवरला नाही. त्याने स्टेजवर डान्स करणाऱ्या महिलेवर पैसे उधळत ठुमके लगावले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर शिपायावर कठोर कारवाई करण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिसच जबाबदार आहेत, पण जेव्हा खाकी आपला सन्मान विसरून अश्लील डान्स आणि पैसे उधळते तेव्हा मात्र मोठा गदारोळ उडतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ कोतवाली क्षेत्रात घडली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात असलेल्या शिपायानं स्टेज शो दरम्यान डान्स करत असलेल्या महिलेसोबत ठुमके लगावत पैसे उधळले आहेत. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. हे वाचा-रामदास आठवलेंची कोरोनावर मात, पत्नी मुलासह हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेल्या माहितीनुसार, बंगारमऊ कोतवाली परिसरातील तैनात कॉन्स्टेबल कमलेश पाल शुक्रवारी बेरिया गाढ़ा गावात झालेल्या नृत्य कार्यक्रमाला गेला होता. येथे सर्वकाही विसरून, त्याने फक्त साध्या गणवेशात बार मुलींसह स्टेजवर ठुमके लगावले. पोलीस आणि खाकी वर्दीची तत्व आणि नियम विसरला. उन्नावचे एसपी आनंद कुलकर्णी यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या शिपायाच्या निलंबानाचे आदेश दिले आहेत. एसपीच्या सूचनेवरून कॉन्स्टेबल कमलेश पाल यांना निलंबित करण्यात आले आहे. कोरोना आणि एकूण सगळ्या प्रकरणाची व्हायरल व्हिडीओनंतर कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या