मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आपल्या जीवाची पर्वा न करता कॉन्स्टेबलने पकडला चोर, Video पाहून नेटकरी करतायत कौतुक

आपल्या जीवाची पर्वा न करता कॉन्स्टेबलने पकडला चोर, Video पाहून नेटकरी करतायत कौतुक

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये दिल्ली पोलिसांचा एक कॉन्स्टेबल आपला जीव धोक्यात घालून स्नॅचरला पकडताना दिसत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 30 नोव्हेंबर : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओज पाहायला मिळतात, जे आश्चर्यकारक असतात. तर काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जे पाहून तुम्ही त्या व्यक्तीचं कौतुक केल्याशिवाय राहाणार नाही.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका कर्तव्यदक्ष पोलीसाने आपल्या जीवाची पर्वा न करता चोराला पकडण्यासाठी धाव घेतली आणि ते त्यामध्ये यशस्वी देखील झाले. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लोकांनी या पोलिसाचे कौतुक केले आहे.

हे ही पाहा : मगरीचा सापावर हल्ला, या लढाईत कोण जिंकेल सांगा? पाहा Viral Video

दिल्ली पोलिसांनी स्वत: आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिल्ली पोलिसांचा एक कॉन्स्टेबल आपला जीव धोक्यात घालून स्नॅचरला पकडताना दिसत आहे.

तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, स्नॅचर दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, जेव्हा दिल्ली पोलिसातील एक जवान आपली दुचाकी घेऊन समोर येतो. त्यावेळेस हा चोर पळून जाण्याचा प्रयत्न करतो, तो पर्यंत पोलीस जवान या चोराची पॅन्ट पकडतो आणि त्याला एका जागेवर धरुन ठेवतो.

खरंतर चालू गाडीमधून असं उतरुन पकडने खरोखर धोकादायक आहे. पण आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी या जवानाने जरा ही विचार केला नाही. शिवाय या चोराकडे एखादं हत्यार असतं तरी देखील तो वार करु शकला असला. पण नशीबाने तशी कोणतीही घटना घडली नाही.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ दिल्ली पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करताना लिहिले, "आपल्या जीवाची पर्वा न करता शाहबाद डेअरी पोलीस ठाण्याचे हवालदार सत्येंद्र यांनी एका स्नॅचरला अटक केली. या स्नॅचरला अटक करून 11 गुन्ह्यांची उकल झाली. कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.''

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक दिल्ली पोलिसांचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओवर अनेक युझर्सनी कमेंट्सही केल्या आहे.

First published:

Tags: Police, Shocking video viral, Social media, Theft, Videos viral, Viral