मराठी बातम्या /बातम्या /Viral /

GF साठी कायपण! अभ्यासात ढ प्रेयसीची परीक्षा द्यायला पोहोचला तरुण; मुलीप्रमाणेच नटलाही पण अशी झाली पोलखोल

GF साठी कायपण! अभ्यासात ढ प्रेयसीची परीक्षा द्यायला पोहोचला तरुण; मुलीप्रमाणेच नटलाही पण अशी झाली पोलखोल

आरोपीचं नाव खादीम बॉप (Khadim Mboup) असं आहे. तो आपल्या 19 वर्षाच्या गर्लफ्रेंडचा पेपर देण्यासाठी पोहोचला होता. विद्यापीठातील स्टाफला संशय येऊ नये यासाठी तो अगदी आपल्या गर्लफ्रेंडप्रमाणेच तयार झाला होता.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 18 ऑगस्ट : आपण असं अनेकदा ऐकलं असेल की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. एका व्यक्तीनं हेच वाक्य अधिक गंभीरतेनं घेतलं आणि असं काही केलं की थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. या व्यक्तीची गर्लफ्रेंड (Girlfriend) ज्या विषयांमध्ये कमजोर होती त्या विषयांचे पेपर देण्यासाठी हा तरुण स्वतःच पोहोचला. यासाठी आरोपीनं आपल्या गर्लफेंडचे कपडेही घातले आणि तिच्या नावानं पेपर देण्यासाठी आला. मात्र, ऐनवेळी त्याची पोलखोल झाली. ही घटना आफ्रिकी देश सेनेगलमधील (Senegal) आहे. स्थानिक मीडिया पल्स सेनेगलनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यान (University Exams) घडली. परीक्षेच्या दरम्यान शिक्षकांना (Teachers) एका युवतीवर संशय आला. जेव्हा अधिक चौकशी केली तेव्हा समजलं, की ज्या व्यक्तीला ते मुलगी समजत होते, तो एक मुलगा आहे. चौकशीत आरोपीनं सांगितलं, की तो आपल्या गर्लफ्रेंडच्या जागी परीक्षा देण्यासाठी आला आहे. यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं आणि पोलिसांनी आरोपीला अटक केलं. VIDEO: हवेतच लष्काराच्या विमानानं घेतला पेट; कॅमेऱ्यात कैद झाला तो थरारक क्षण आरोपीचं नाव खादीम बॉप (Khadim Mboup) असं आहे. तो आपल्या 19 वर्षाच्या गर्लफ्रेंडचा पेपर देण्यासाठी पोहोचला होता. विद्यापीठातील स्टाफला संशय येऊ नये यासाठी तो अगदी आपल्या गर्लफ्रेंडप्रमाणेच तयार झाला होता. त्यानं ट्रेडिशनल स्कार्फ, कानातलं घालत मेकअपही केला होता. इतकंच नाही तर त्यानं आपल्या गर्लफ्रेडची अंतरवस्त्रेही घातली होती. यानंतर त्यानं परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवला, सलग तीन दिवस त्यानं असंच केलं, मात्र चौथ्या दिवशी तो पकडला गेला. खरंच प्रेमात आंधळा झाला! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्याच्या नादात शेकडोंचा जीव पणाला परीक्षेच्या दरम्यान एका निरीक्षकाला खादीमवर संशय आला. जेव्हा तपासणी केली गेली तेव्हा त्याची पोलखोल झाली. हे प्रकरण या महिन्याच्या सुरुवातीचं असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी खादीमविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पकडला गेल्यानंतरही त्यानं आपल्या गर्लफ्रेंडला संकटात येऊ दिलं नाही. त्यानं पोलिसांना सांगितलं, की त्याच्या गर्लफ्रेंडला याबाबत काहीही माहिती नसून हे पूर्ण प्लॅनिंग त्याचंच होतं.
First published:

Tags: Girlfriend, Love story, Viral news

पुढील बातम्या