मराठी बातम्या /बातम्या /Viral /

फिरायला निघालेल्या कपलला विमानतळावरच अडवलं; सूटकेस उघडून पाहताच थेट तुरुंगात रवानगी

फिरायला निघालेल्या कपलला विमानतळावरच अडवलं; सूटकेस उघडून पाहताच थेट तुरुंगात रवानगी

टेक्सासमधून लॉस वेगस (Las Vegas) येथे जात असलेले जार्ड आणि क्रिस्टी ओवेन्स 26 सप्टेंबरला आपल्या घरातून विमानतळावर निघाले. हे कपल सुट्टया घालवण्यासाठी लुब्बॉक येथे जात होतं.

टेक्सासमधून लॉस वेगस (Las Vegas) येथे जात असलेले जार्ड आणि क्रिस्टी ओवेन्स 26 सप्टेंबरला आपल्या घरातून विमानतळावर निघाले. हे कपल सुट्टया घालवण्यासाठी लुब्बॉक येथे जात होतं.

टेक्सासमधून लॉस वेगस (Las Vegas) येथे जात असलेले जार्ड आणि क्रिस्टी ओवेन्स 26 सप्टेंबरला आपल्या घरातून विमानतळावर निघाले. हे कपल सुट्टया घालवण्यासाठी लुब्बॉक येथे जात होतं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : कुत्र्याची गणना जगातील सर्वाधिक ईमानदार प्राण्यांमध्ये होते. आपल्या मालकावर आलेलं कोणतंही संकट कुत्रा स्वतःवर घेतो. मात्र, काही श्वान कधी कधी आपल्या मालकालाच अडचणीत टाकतात. असंच एक प्रकरण टेक्सासमधून समोर आलं आहे. इथे एका कपलला विमानतळावर (Airport) पकडण्यात आलं. कपलची सूटकेस त्यांनी सांगितलेल्या वजनापेक्षा जड (Overweight Suitcase) होती. जेव्हा ही सूटकेस उघडली गेली, तेव्हा यात त्यांचा पाळीव कुत्रा बसला असल्याचं दिसलं (Pet Dog in Suitcase). हा कुत्रा लपून आपल्या मालकासोबत टूरवर निघाला होता. चौकशीत कपलनं सांगितलं, की त्यांना याची कल्पनाही नव्हती ती कुत्रा यात बसला आहे.

ती मागणी पूर्ण न झाल्यानं भडकली नवरी; स्टेजवरच केलं असं काही की..., पाहा VIDEO

टेक्सासमधून लॉस वेगस (Las Vegas) येथे जात असलेले जार्ड आणि क्रिस्टी ओवेन्स 26 सप्टेंबरला आपल्या घरातून विमानतळावर निघाले. हे कपल सुट्टया घालवण्यासाठी लुब्बॉक येथे जात होतं. ट्रॅव्हल गाईडलाईन्सच्या नियमांनुसार त्यांनी आपली सुटकेस पॅक केली. मात्र, जेव्हा ते लगेज सबमिट करू लागले तेव्हा त्यांची बॅग ठरलेल्या वजनापेक्षा जास्त जड असल्याचं आढळलं. ही बॅग जेव्हा उघडली गेली, तेव्हा आतलं दृश्य पाहून कपललाही धक्का बसला. सूटकेसमध्ये त्यांचा पाळीव कुत्रा होता. कपलला या गोष्टीची भनकही लागली नाही, की हा कुत्रा सूटकेसमध्ये कधी बसला.

KCBD नावाच्या एका स्थानिक चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत या कपलनं सांगितलं, की ते आपल्या छोट्याशा पाळीव कुत्र्याला शेजाऱ्याकडे ठेवून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर निघाले होते. त्यांनी पॅकिंग केली आणि ते घरातून बाहेर निघाले. मात्र, लगेज जमा करताना त्यांना सांगितलं गेलं, की त्यांची बॅग ठरलेल्या वजनापेक्षा भरपूर जड आहे. यामुळे कपलनं यातील काही सामान काढण्यासाठी आपली बॅग उघडली. बॅगमधून एक चप्पल बाहेर काढल्यानंतर त्यांना दिसलं की याच्याखाली त्यांचा पाळीव कुत्रा बसलेला आहे.

VIDEO : प्रेयसीला लग्नासाठी मागणी घालत असतानाच झाली तिसऱ्याची एण्ट्री अन्...

डेली मेलमध्ये आलेल्या वृत्तानुसार, बॅगमध्ये कुत्रा आढळल्यानंतर या कपलची चौकशी करण्यात आली. प्राण्यांचं स्मगलिंग केल्याच्या आरोपात त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. मात्र, कपलनं पोलिसांना सांगितलं, की त्यांना याची भनकही नव्हती की कुत्रा बॅगमध्ये लपलेला आहे. नंतर एअरपोर्टवर उपस्थित कपलच्या ट्रॅव्हल एजेंटनं ते कपल परत येईपर्यंत या कुत्र्याची काळजी घेतली. आपण वेळीच बॅग उघडून तपासली हे बरं झालं. अन्यथा या श्वानाचा जीव गेला असता, असं या कपलनं म्हटलं.

First published:

Tags: Owner of dog, Pet animal