15 फुटांवरुन कोसळल्यानंतरही डान्स करत राहिली पोल डान्सर, सोशल मीडियावर व्हिडीओ VIRAL

15 फुटांवरुन कोसळल्यानंतरही डान्स करत राहिली पोल डान्सर, सोशल मीडियावर व्हिडीओ VIRAL

अमेरिकेमध्ये पोल डान्स करताना 15 फुटांवरुन कोसळल्याने एक पोल डान्सर गंभीर जखमी झाली आहे. यामध्ये तिचा जबडा फुटला असून दात-ओठांना देखील मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. 15 फुटांवरून कोसळल्यानंतरही ही पोल डान्सर डान्स करत राहिली. त्यामुळे सोशल मीडियावर तिचं कौतुक होत आहे.

  • Share this:

टेक्सास, 13 फेब्रुवारी : अमेरिकेमध्ये पोल डान्स करताना 15 फुटांवरुन कोसळल्याने एक पोल डान्सर गंभीर जखमी झाली आहे. यामध्ये तिचा जबडा फुटला असून दात-ओठांना देखील मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. 15 फुटांवरून कोसळल्यानंतरही ही पोल डान्सर डान्स करत राहिली. त्यामुळे सोशल मीडियावर तिचं कौतुक होत आहे. दरम्यान अपघातानंतर तिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. या पोल डान्सरच्या जबड्याजवळ टाके घालण्यात आले आहेत. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये ही घटना घडली. जीनिया असं या पोल डान्सरचं नाव असून ती स्काय डलासमध्ये एक्सटीसी कॅफेमध्ये काम करायची. पोलवर 15 फुटांवर उलटी लटकून ती डान्स करत होती. त्यावेळी तिचा तोल गेला आणि क्षणार्धात ती खाली कोसळली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर 10 मिलीयनहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

जीनियाच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी याकरता अनेकांनी प्रार्थना केली आहे. सोशल मीडियावरही त्यांनी कमेंट्स करुन त्याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर जीनियाने आपल्या चाहत्यासाठी एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये तिने नेमकं काय घडलं याबाबत सांगितलं आहे. त्याचप्रमाणे तिच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्यांचे आभार देखील जीनियाने मानले आहेत. हा व्हिडीओ तिने इन्साग्रामवर पोस्ट केला आहे.

जीनियाच्या सुधारणेबाबत चौकशी करणाऱ्यांनी अशी देखील कमेंट केली होती की, ‘अमेरिकेतील कामगारांना मिळाणाऱ्या सुविधा तिला मिळत असतील अशी आशा आहे’. अमेरिकेत कामगारांना अपघातानंतर उपचारासाठी विम्याची ठराविक रक्कम मिळते. मात्र ज्या कॅबरेमध्ये जीनिया डान्स करायची त्या कॅबरेने या घटनेची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. त्याचप्रमाणे जीनिया त्यांची कायमस्वरुपी कर्मचारी नसल्यामुळे नुकसान भरपाई देण्यासही नकार दिला आहे.

 

View this post on Instagram

 

Today has been a very long day. My surgery went well. My jaw is currently wired shut so please refrain from calling me as of right now and bare with me on replies because my phone hasn’t stopped blowing up. Everyone’s love & kind words have not gone unnoticed whatsoever and it means so much to me that all of you have blessed me and uplifted me in so many ways. I am overwhelmed in the best way by all the support. I was really nervous as this all started blowing up because people are cruel and this is a very sensitive time for me. But I never imagined so many people would stand behind me in a situation like this and that has outweighed all the negativity by far. I am beyond grateful for you all. I am in a tremendous amount of pain but i am ready for this road to recovery so I can get back to my life. I will continue to update everyone over the course of my recovery but thank you once again for EVERYTHING 🙏🏽

A post shared by @ genea_sky on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2020 04:28 PM IST

ताज्या बातम्या