मुंबई, 09 फेब्रुवारी : तोंडातून आग ओकणारा प्राणी कोणता विचारलं तर साहजिकच तुमच्यासमोर ड्रॅगनच येईल. आतापर्यंत बऱ्याच फिल्ममध्ये तुम्ही आग ओकणारा ड्रॅगन पाहिला असेल. पण कधी अस्वलाला तुम्ही तोंडातून आग ओकताना पाहिलं आहे का? तेसुद्धा बर्फाळ प्रदेशात? वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, हे शक्यच नाही असंच तुम्ही म्हणाला. पण अशाच आग ओकणाऱ्या बर्फाळ प्रदेशातील अस्वल व्हायरल होतो आहे.
बर्फाळ प्रदेशात राहणारा पोलर बिअर म्हणजे ध्रुवीय अस्वलाच्या तोंडातून चक्क आग बाहेर येताना दिसली. उत्तर ध्रुवी प्रदेशात राहणारं हे अस्वल. कितीही गोंडस दिसत असलं तरी ध्रुवीय अस्वल अतिशय धोकादायक असतात आणि मानवांना त्यांच्यापासून विशेष धोका असतो. ध्रुवीय अस्वलाच्या हल्ल्यात अनेकदा मानवी जीव गेले आहेत. पण अनेकदा त्यांच्याशी संबंधित अशी छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर येतात जे आश्चर्यचकित करणारे असतात. असंच हे अस्वल जे खूप व्हायरल होत आहे.
हे वाचा - काय तो अॅट्यिट्युड, काय ती पोझ; अस्वलालाही आवरला नाही Selfie चा मोह; काढले तब्बल 400 PHOTO
@Rainmaker1973 या ट्विटर अकाऊंटवर या अस्वलाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात ध्रुवीय अस्वल आर्क्टिकच्या बर्फाळ चादरीवर उभा असल्याचं दिसत आहे. त्याने तोंड उघडलं असून त्यातून आग निघताना दिसते.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांना आश्चर्य वाटले की हे कसं शक्य आहे. जास्त थंडी लागली की आपल्या तोंडातून वाफा निघतात. तुम्ही बर्फाळ प्रदेशात गेला असाल तर तिथं हे तुम्हाला जाणवलं असेल. पण अशाच बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या अस्वलाच्या तोंडातून मात्र चक्क आग कशी बाहेर पडू लागली? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
या फोटोबाबत सांगायचं तर हा फोटो वाइल्डलाइफ फोटोग्राफर जोश अॅनने 2015 साली काढला होता आणि आता तो पुन्हा व्हायरल होत आहे. वास्तविक, फोटोत अस्वलाच्या तोंडातून आग बाहेर पडत नाही आहे. तर ती सामान्य वाफ आहे. पण सूर्याची किरणे वाफेमध्ये अशा प्रकारे पडत आहेत की ती चमकू लागली आहे आणि जणू काही अस्वलाच्या तोंडातून आगच बाहेर पडते आहे, असं भासतं.
हे वाचा - विचित्र किडा म्हणून चुकूनही याला मारू नका; तुम्हाला सापडला तर तुम्ही करोडपती बनाल
हा फोटो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. इतका सुंदर फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचं कौतुक केलं जातं आहे. एका युझरने याला अस्वल नव्हे तर ध्रुवीय ड्रॅगन म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral photo, Wild animal