पंंचकूला, 23 डिसेंबर : आईटीबीपीच्या (ITBP) जवानांच्या हिमवीरदेखील म्हटले जाते. गिधाडांसारखी नजर आणि जंगलातील युद्धाच्या वेळीही नक्षलवादी आणि दहशतवाद्यांशी लढण्याची क्षमता त्याच्यात असते. ते त्यांच्या शौर्यासाठी ओळखले जातात. चीनला लागून असलेल्या सीमेवरील भागात आयटीबीपीचे जवान तैनात असतात. जे अत्यंत बर्फाळ वातावरणातही देशाच्या सीमेचं रक्षण करतात. आयटीबीपी सैनिकांकडून वीरता आणि शौर्याच्या अनेक बातम्या ऐकण्यात आल्या आहेत. दरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहून तुम्ही आयटीबीपी जवानांचे कौतुक करणं थांबवू शकणार नाही.
हा व्हिडीओ हरियाणातील पंचकूला येथील नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्ज अॅण्ड अॅनिमल सेंटर म्हणजे ITBP वेटनरी रुग्णालयातील ITBP जवानांचा आहे. येथे एक जखमी क्रोब्यावर जवान उपचार करीत असताना दिसत आहे. हा क्रोबा अत्यंत धोकादायक असून तो जखमी झाला होता. अशा अवस्थेत त्यांची जगण्याची शक्यता अत्यंत कमी होती.
असं मानलं जातं की जर सापाला रक्तस्त्राव होत असलं तर मुंग्यासह अनेक किड्यांपासून त्याचा बचाव करणं अवघड असतं. त्या अवस्थेत ITBP च्या जवानांची त्याच्यावर लक्ष गेलं. त्यानंतर क्रोबावर उपचार करण्यासाठी त्याला प्राण्यांच्या रुग्णालयात आणून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
15 दिवसांनंतर निरीक्षण केल्यानंतर जंगलात सोडलं.
15 दिवसांनंतर त्याचं निरीक्षण केल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आलं. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार समोर आला होता. जेव्हा ITBP च्या जवानांनी हरियाणातील पंचकूला येथील NTCD-A मध्ये दोन हरणांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं होतं.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.