ही आजी झाली मोदींची जबरा फॅन, असं गाणं गायलं की जगभरात झाली तुफान VIRAL

या आजींनी गाण्यात पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, कन्या विवाह योजना, जन धन खात्यासह अनेक योजनांचा उल्लेख केला आहे.

या आजींनी गाण्यात पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, कन्या विवाह योजना, जन धन खात्यासह अनेक योजनांचा उल्लेख केला आहे.

  • Share this:
    लखीमपूर खीरी, 31 डिसेंबर : यंदाचं हे वर्ष कोरोना आणि अनेक अडचणींचा सामना करत सरलं येणारं वर्षा अधिक ऊर्जा आणि उत्साहानं जगण्यासाठी नवा संकल्प केला जात आहे. याच दरम्यान मोदींची जबरदस्त फॅन असलेल्या आजींनी त्यांच्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी खास गाणं गायलं आहे. आजींचं हे गाणं सोशल मीडियावर काही मिनिटांत इतक तुफान व्हायरल झालं की त्या जगभरात प्रसिद्ध झाल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील राहणाऱ्या या आजींची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या गाण्यात आजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत असल्याचं दिसत आहे.पंतप्रधानांच्या योजनांचा लाभ मिळाल्यानंतर आजींनी त्यांना गाण्याद्वारे 100 वर्षे जगण्याचे आशीर्वाद दिले आहेत. गाण्यामध्ये आजींना ज्या योजनांचा लाभ मिळाला त्याचा उल्लेख देखील त्यांनी केला आहे. हे वाचा-सुपर से उपर! आपल्यापेक्षाही सॉलिड डान्स करता हे रोबो, पाहा हा VIDEO या आजींनी गाण्यात पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, कन्या विवाह योजना, जन धन खात्यासह अनेक योजनांचा उल्लेख केला आहे. घर, गॅस आणि विजेचे कनेक्शन, मुलीचे लग्न आणि तिच्या आयुष्यात तिच्या खात्यात पैसे कसे आले हे या आजी गाण्यातून सांगत आहेत. इतकेच नव्हे तर कोरोना काळातही त्यांना विनामूल्य रेशन मिळालं. या सगळ्यातचं श्रेय मोदींना देत त्यांचं कौतुक करत गायलेल्या गाण्याचा या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: