मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भरधाव विमानाच्या पंखात आलं त्याचं डोकं आणि...; रन-वेवरील भयंकर दुर्घटनेचा धडकी भरवणारा VIDEO

भरधाव विमानाच्या पंखात आलं त्याचं डोकं आणि...; रन-वेवरील भयंकर दुर्घटनेचा धडकी भरवणारा VIDEO

रन-वेवर वेगाने धावणारं विमान त्याच्या डोक्यावरच धडकलं.

रन-वेवर वेगाने धावणारं विमान त्याच्या डोक्यावरच धडकलं.

रन-वेवर वेगाने धावणारं विमान त्याच्या डोक्यावरच धडकलं.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 18 ऑक्टोबर : विमान दुर्घटनेच्या (Plane accident video) बऱ्याच बातम्या आपण पाहिल्या आहेत. अशा दुर्घटनेचे व्हिडीओही आपण पाहिले आहेत. अशाच एका विमान दुर्घटनेचा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात भरधाव विमान एका व्यक्तीला धडकलं आहे. विमानाचा पंख या व्यक्तीच्या डोक्याला आदळतं. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे.

रन-वेवरील विमान दुर्घटनेचा हा धक्कादायक व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती रन-वेवर दिसते आहे. तिच्या मागून एक विमान वेगानं येतं. या विमानाचा एक पंखा या व्यक्तीच्या डोक्याला धडकतो. व्हिडीओ पाहून आपल्याही अंगावर अक्षरशः काटा येतो.

ज्या व्यक्तीला विमानाच्या पंखा धडकला तिला जोरदार फटका बसल्याचं दिसतं. विमान डोक्यावर आपटून गेल्यावर ही व्यक्ती आपल्या डोक्यावर हात ठेवते. यावरूनच तिच्या डोक्यावर मार बसल्याचं स्पष्ट होतं.  व्यक्तीने तिचं संरक्षण होईल असा ड्रेस घातला आहे. त्यामुळे तिला नेमकी किती गंभीर दुखापत झाली असावी याचा अंदाज नाही.

हे वाचा - भीषण VIDEO! पोलीस इन्स्पेक्टरच्या कारने दोन तरुणींना चिरडलं, एकीचा जागीच मृत्यू

विमानाच्या धडकेमुळे ही व्यक्ती पूर्णपणे फिरते. त्यानंतर विमानाचं पुढे काय होतं, तेसुद्धा दिसतं. विमानही पुढे जाऊन टर्न होतो. विमानाचे काही भागही तुटून रन-वेवर कोसळ्याचे दिसतात. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे माहिती नाही.  बेस्ट व्हिडीओज ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Viral, Viral videos