मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रहस्यमयी घटना: लँडिंगच्या 20 मिनिटं आधी आकाशातच गायब झालं विमान; घटनेचा उलगडा नाहीच

रहस्यमयी घटना: लँडिंगच्या 20 मिनिटं आधी आकाशातच गायब झालं विमान; घटनेचा उलगडा नाहीच

2016 मध्ये इजिप्तमध्ये (Egypt) एक अशी रहस्यमयी घटना घडली, ज्याबाबत आजही कोणालाच, कोणतीच माहिती मिळालेली नाही. एक विमान (Airplane) लँडिंगच्या केवळ 20 मिनिटं आधी आकाशातून गायब झालं.

  नवी दिल्ली, 2 मे : जगभरात अशा काही घटना घडतात, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. अशा घटना अनेक काळापर्यंत एक रहस्य म्हणूनच राहतात. अशाच एका रहस्यमयी घटनेचा अद्यापही उलगडा झालेला नाही. 2016 मध्ये इजिप्तमध्ये (Egypt) एक अशी रहस्यमयी घटना घडली, ज्याबाबत आजही कोणालाच, कोणतीच माहिती मिळालेली नाही. एक विमान (Airplane) लँडिंगच्या केवळ 20 मिनिटं आधी आकाशातून गायब झालं. हवेतच हरवलं एक रहस्य - इजिप्त एयरलाईन्सचं (Egypt Airlines) विमान एयरबस-320 ने (Airbus-320) जगातील सर्वात मॉडर्न एयरपोर्टमध्ये (Most Modern Airport) सामिल असलेल्या मिस्त्रच्या कायरो एयरपोर्टसाठी (Cairo Airport) उड्डाण केलं होतं. या विमानात एकूण 66 प्रवासी होते. परंतु लँडिंगच्या केवळ 20 मिनिटं आधी हे विमान आकाशात गायब झालं. या रहस्यमयी (Weird Incident) घटनेबाबत अद्यापही कोणाला कोणतीच माहिती नाही. या विमानाचे ना अवशेष मिळाले, ना कोण्या प्रवाशाचा मृतदेह. त्यामुळे या विमानाच्या लँडिंगवेळी काही मिनिटंआधी नेमकं काय झालं याचा कोणताच उलगडा झालेला नाही.

  (वाचा - VIDEO: 'नेम धरून घातला हार'; कोरोना संकटात नवरा-नवरीकडूनही नियमांचं काटेकोर पालन)

  केवळ 4 तासांचा होता प्रवास - इजिप्त एयरलाईन्सचे पॅसेंजर प्लेन एयरबस-320 ने 18 मे 2016 रोजी पॅरिसमधून मिस्त्रच्या कायरो शहरासाठी उड्डाण केलं होतं. या विमानात एकूण 66 जण होते, त्यापैकी 56 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते. या प्रवासासाठी केवळ चार तासांचा अवधी लागणार होता. परंतु 3 तास 40 मिनिटांच्या उड्डाणानंतर हे विमान अचानक आकाशातच गायब झालं.

  (वाचा - घरात घुसून कोब्राने मारला कोंबडी आणि अंड्यांवर ताव; पुढे काय झालं पाहा VIDEO)

  त्यावेळी विमानाशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याला यश आलं नाही. त्यावेळी विमान हायजॅक (Flight Hijack) केलं असल्याचा किंवा अपघात झाल्याचा अंदाज लावला जात होता. परंतु कशाचाही पुरावा मिळाला नाही. तसंच विमानाचे कोणतेही पार्ट किंवा प्रवाशांपैकी कोणाचाच थांगपत्ता न लागल्याने या विमानाचं नेमकं काय झालं, हे अद्यापही रहस्यच आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Travel by flight

  पुढील बातम्या