Home /News /viral /

Shocking! आकाशातून थेट जमिनीवरील कारवर कोसळलं विमान; भयंकर अपघाताचा VIDEO VIRAL

Shocking! आकाशातून थेट जमिनीवरील कारवर कोसळलं विमान; भयंकर अपघाताचा VIDEO VIRAL

विमान आणि कार अपघाताचा भयंकर व्हिडीओ समोर आला आहे.

    वॉशिंग्टन, 25 जून : रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी बरेच नियम आहेत. अपघात होऊ नये म्हणून वारंवार या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जातं. पण सर्व नियम पाळून रस्त्यावर सुरक्षित ड्रायविंग करताना आकाशातूनच मृत्यू आला तर. अशाच एका भीषण दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Plane crash on car). विमानाच्या रुपाने आकाशातून कारवर मृत्यूच कोसळला (Plane and car accident video). अपघाताचा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुमचा श्वासही थोडा वेळ थांबेल. काळजाचा ठोका चुकवणारं असं हे दृश्य आहे. व्हिडीओत पाहू शकता एक कार रस्त्यावरून जाते आहे. इतक्यात या कारवर आकाशातून जणू मृत्यूच कोसळतो. आकाशातून एक विमान जमिनीच्या दिशेने वेगाने येतं ते या कारवर आदळतं. कारवर आदळून विमान पुढे रस्त्यावर पडतं आणि ब्लास्ट होत विमान पेट घेतं. विमानाला आग लागते. जेव्हा हे विमान गाडीवर क्रॅश होतं तेव्हा विमान आणि गाडी दोघांचे तुकडे तुकडे झालेले पाहायला मिळतात. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमानाला आपली दिशा बदलावी लागली. विमान एअरपोर्टच्या रनवेपासून काही फूट अंतरावर असलेल्या कार वर कोसळलं. ही घटना 2021 साली फ्लोरिडामध्ये घडली होती. नॉर्थ पेरी एअरपोर्टजवळील पेम्ब्रोक पाइन्सवर हा भीषण अपघात झाला होता. पण त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडिया वर पुन्हा व्हायरल होतो आहे. @LookedExpensive ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. ज्यात 4 वर्षांच्या मुलगाही होता. त्याच्या आईचा जीव वाचला होता. कारमधून बाहेर येत तिने आपल्या मुलाला वाचवण्या साठी मदत मागितली पण रेस्क्यू टीम पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Airplane, Viral, Viral videos

    पुढील बातम्या