मुंबई, 06 डिसेंबर : रस्त्यावर आपत्कालीन स्थितीमध्ये विमान उतरल्याच्या काही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या मात्र आता तर भऱधाव गाड्या जात असताना महामार्गावर विमान उतरवण्याचं धाडस एका वैमानिकानं केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वैमानिकानं आपत्कालीन स्थितीत हे विमान उतरवल्याची चर्चा आहे. हा व्हिडीओ पाहून युझर्नाही आश्चर्य वाटलं. दोन्ही बाजूनं महामार्गावर वेगानं गाड्या जात असताना वैमानिकानं कसब दाखवून विमानाचं लॅण्डिंग केलं आहे.
अमेरिकेतील मिनेसोटा (minnesota) भागात सिंगल इंजिन असलेल्या एका विमानानं महामार्गावर विमान उतरवलं आहे. हे विमान लँड करत असताना तो SUV कारवर जाऊन धडकला आणि मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
ICYMI: A plane landed on 35W last night. (Yes, really!)
While this isn't *quite* what we mean by a "multimodal transportation system," we're glad no one was injured and are impressed by the pilot's effort to #zippermerge from above! pic.twitter.com/imPdiQ1wMX
— Minnesota Department of Transportation (@MnDOT) December 3, 2020
कारवर हे विमान आदळल्याने कारचं नुकसान झालं आहे. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिनेसोटा डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टने या घटनेचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. विमान 35W महामार्गावर लॅण्ड झाल्याची माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे. सुदैवानं यावेळी कोणताही मोठा अपघात घडला नाही किंवा कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.
या व्हिडीओला आतापर्यंत 87 हजारहून अधिक लोकांनी पाहिले आहे. काही लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या तर काहींनी अशापद्धतीनं विमान उतरवणं चुकीचं असून कोणताही मोठा अपघात घडू शकला असता असंही म्हटलं आहे. माझा विश्वास बसत नाही की विमानानं एवढी जोरात धडक दिल्यानंतरही कार चालकाला गंभीर दुखापत झाली नाही. तो सुरक्षित आहे हा एक चमत्कार म्हणायला हवा अशी प्रतिक्रिया वैमानिकानं स्थानिक मीडियाला दिली आहे.