न्यू टायटॅनिक! प्रवाशांनी भरलेली धावती बस गेली खड्ड्यात, VIDEO VIRAL

प्रवाशांनी भरलेली बस गेली खड्ड्यात, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 07:51 PM IST

न्यू टायटॅनिक! प्रवाशांनी भरलेली धावती बस गेली खड्ड्यात, VIDEO VIRAL

रस्त्यांची झालेली चाळण हे प्रकार भारतीयांसाठी किंवा मुंबईकरांसाठी नवे नाही. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात खड्ड्यामुळे लोकांना जीव गमवावे लागले. मात्र असे प्रकार भारतातच होतात असे नाही. अमेरिकेतही नुकताच असा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळं लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अमेरिकेतील सिटी ऑफ पिट्सबर्ग येथे प्रवाशांनी भरलेली एक धावती बस खड्ड्यात गेली.

दरम्यान, या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये या बसचा अर्ध्याहून जास्त भाग खड्ड्याच गेल्याचे दिसत आहे. सुदैवानं या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. एक महिला फक्त या अपघातात जखमी झाली. त्यामुळं या अपघाताचे आता सोशल मीडियावर मीम्स तयार होत आहेत.

ट्विटरवर हा व्हिडीओ व्हारयल होत असून, या अपघाताची तुलनाही टायटॅनिकशी केली जात आहे. टायटॅनिक जहाजही सर्व प्रवाशांसह समुद्रात बुडाले होते. असाच हा प्रकार होता, जेव्हा धावती बस खड्ड्यात पडली.

Loading...

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं या बसला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. बसला बाहेर काढतानाचा हा व्हिडीओ सिटी ऑफ पिट्सबर्ग शहराच्या अधिकृत ट्विटरवर शेअर करण्यात आला.

दरम्यान या खड्ड्याची दुरुस्ती करण्यात न आल्यामुळं टीकाही करण्यात आली आहे. CBS Newsनं दिलेल्या माहितीनुसार ज्या रस्त्यावर हा खड्ड्या पडला आहे, तो रस्ता गेले आठ आठवडे प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे.

VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2019 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...