Home /News /viral /

'माझी शिफ्ट संपली'; अर्ध्या प्रवासानंतरच वैमानिकाने दिला विमान उडवण्यास नकार अन्...

'माझी शिफ्ट संपली'; अर्ध्या प्रवासानंतरच वैमानिकाने दिला विमान उडवण्यास नकार अन्...

एका पायलटने रविवारी सौदी अरेबियाची राजधानी रियादमधून एक विमान इस्लामाबाद येथे आणण्यास नकार दिला (Pilot Refused to Fly Plane). वैमानिकाचं असं म्हणणं होतं, की त्याच्या कामाची वेळ संपली आहे.

  कराची 17 जानेवारी : पाकिस्तानच्या एका पायलटने रविवारी सौदी अरेबियाची राजधानी रियादमधून एक विमान इस्लामाबाद येथे आणण्यास नकार दिला (Pilot Refused to Fly Plane). वैमानिकाचं असं म्हणणं होतं, की त्याच्या कामाची वेळ संपली आहे. त्यामुळे तो विमान उडवणार नाही.

  खाडीच्या चिखलात अडकली Toyota Car..! रेस्क्यूचा Live Video

  पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (Pakistan International Airlines) वैमानिकाने विमान प्रवासाच्यादरम्यान उडवण्यास नकार दिला. यानंतर विमानातील प्रवासी भडकले आणि याचा विरोध करत त्यांनी सांगितलं, की आम्ही विमानातून उतरणार नाही. पाकिस्तानच वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, PIA ने सांगितलं की पीके-9754 या विमानाने सौदी अरबची राजधानी रियाद येथून उड्डाण केलं. मात्र, हवामान खराब असल्याने विमान दम्मम येथेच लँड करण्यात आलं. दम्म्म येथे हे विमान लँड झाल्यानंतर वैमानिकाने इस्लामाबादला हे विमान घेऊन घेऊन जाण्यास नकार दिला. त्याने आपली ड्यूटी संपली असल्याचं यावेळी सांगितलं. वैमानिकाच्या या निर्णयाचा विरोध करत प्रवाशांनी विमानातून उतरण्यास नकार दिला. अखेर स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एअरपोर्ट सिक्योरिटी बोलवावी लागली.

  अवघ्या 2000 रुपयांसाठी वृद्ध प्यायला नाल्याचं पाणी; Shocking Video Viral

  PIA च्या प्रवक्त्याने सांगितलं की सुरक्षित उड्डाणासाठी पायलटला योग्यवेळी आराम घेणं गरजेचं आहे. त्यामुळे याचप्रमाणे व्यवस्था केली गेली होती. याआधी PIA कडून सौदी अरेबियासाठी थेट विमान सेवा विस्तृत नव्हती. नोव्हेंबरमध्ये PIA ने घोषणा केली होती, की ते सौदी अरेबियासाठी फ्लाईट सुरू करणार आहेत. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, PIA च्या फ्लाईट इस्लामाबाद, कराची, लाहौर , मुल्तान आणि पेशावरसही पाकिस्तानातील विविध शहरांमधून रवाना होतील.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Airplane, Pakistan

  पुढील बातम्या