Home /News /viral /

बापरे! या उशीची किंमत वाचूनच उडेल झोप; 45 लाख मोजायला तयार आहेत लोक, काय आहे खास?

बापरे! या उशीची किंमत वाचूनच उडेल झोप; 45 लाख मोजायला तयार आहेत लोक, काय आहे खास?

नेदरलँडमध्ये बनवण्यात आलेल्या एका उशीची किंमत तब्बल 45 लाख (Pillow worth rupees 45 Lakh) रुपये आहे. एवढी किंमत असायला या उशीमध्ये नेमकं काय खास आहे, ते जाणून घेऊ या.

मुंबई 25 जून : झोपताना बहुतांश जणांना डोक्याखाली उशी घेण्याची सवय असते. कित्येकांना तर उशी घेतल्याशिवाय झोपच येत नाही; मात्र आम्ही ज्या उशीबद्दल बोलत आहोत तिची किंमत तुम्ही ऐकली, तर तुमची झोपच उडेल. साधारणपणे उशीची किंमत सुमारे 200-300 रुपये असते. अगदीच महागातली उशी घ्यायची झाली, तरी आपण 1000 रुपयांच्या वरचा विचार कोणी करत नाही; मात्र नेदरलँडमध्ये बनवण्यात आलेल्या एका उशीची किंमत तब्बल 45 लाख (Pillow worth rupees 45 Lakh) रुपये आहे. एवढी किंमत असायला या उशीमध्ये नेमकं काय खास आहे, ते जाणून घेऊ या. नेदरलँडच्या एका फिजिओथेरपिस्टने ही उशी (Pillow made by Netherland’s Physiotherapist) तयार केली आहे. ही उशी तयार करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची 15 वर्षं रिसर्च केल्याचं ते सांगतात. एवढ्या वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर एक ‘परफेक्ट’ उशी (Most perfect pillow) बनवण्यास त्यांना यश मिळालं आहे. WION या वेबसाइटच्या हवाल्याने झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आता काय म्हणावं! सुंदर दिसण्याच्या नादात तरुणाने चक्क साबणच कचाकचा चावून खाल्ला; VIDEO VIRAL डोकं टेकवताच येईल झोप या उशीची खासियत म्हणजे, यावर डोकं टेकवताच तुम्हाला झोप येईल. निद्रानाश, घोरणं, डोकेदुखी अशा तक्रारी असलेल्या व्यक्तीही या उशीच्या मदतीने आरामात झोपू शकतात. सोबतच या उशीमुळे दिवसभराचा मानसिक थकवा, ताणदेखील दूर होतो, (Pillow that gives relief from stress) असा दावा करण्यात येत आहे. उशीमध्ये भरलंय सोनं-चांदी आणि हिरे या उशीची आणखी एक विशेष बाब म्हणजे यात चक्क सोनं, चांदी, हिरे आणि इतर रत्नं (Pillow stuffed with gold and diamonds) भरली आहेत. सोबतच आतमध्ये असणारा कापूस हा रोबोट मिलिंग मशीनचा आहे. या उशीच्या चेनमध्येदेखील (झिप) चार हिरे ठेवण्यात आले आहेत. Cashew and Mohful Wine : काजू आणि मोहफूल या देशी मद्यांना आता मिळणार इंग्लिश नजराणा, विदेशी दारू म्हणण्याचा सरकारचा निर्णय भरपूर प्रतिसाद या उशीची किंमत तब्बल 57 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 45 लाख रुपये (World’s most expensive pillow) ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची केवळ एकच नाही, तर कित्येक उशा तयार करण्यात आल्या आहेत. आता तुम्हाला वाटत असेल, की एवढी महागडी उशी घेणार कोण? तर, या फिजिओथेरपिस्टने दिलेल्या माहितीनुसार, भरपूर जण ही उशी घेण्यासाठी आतापासूनच रांगेत आहेत. यातल्या काही विशिष्ट व्यक्तींना ब्रँडेड बॉक्समध्ये पॅकिंग करूनच ही उशी विकण्यात येणार आहे. पैशांनी सुखाची झोप विकत घेता येत नाही, असं आपल्याकडे जुन्या-जाणत्या व्यक्ती म्हणतात; मात्र आजकाल सुखाची झोप केवळ 45 लाख रुपयांना विकत घेता येते म्हटल्यावर ही उशी घेण्यासाठी कित्येक जण तयार होत आहेत.
First published:

Tags: Viral news

पुढील बातम्या