• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • पांढरा कावळा कधी पाहिलाय का? वेधतोय सगळ्यांचं लक्ष, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

पांढरा कावळा कधी पाहिलाय का? वेधतोय सगळ्यांचं लक्ष, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तज्ज्ञांच्या मते 10 हजार कावळ्यांमध्ये एखादा असा पांढरा कावळा आढळतो. संपूर्ण गुजरातमध्ये फक्त एक किंवा दोन असे पांढरे कावळे असण्याची शक्यता आहे

  • Share this:
अहमदाबाद 21 सप्टेंबर : एरवी आपण काळ्या, कुरूप कावळ्याला हाकलून लावत असलो तरी सध्याचा जो काळ सुरू आहे त्यात त्याची प्रतिक्षा केली जाते. त्यानं यावं आणि श्राद्धानिमित्त केलेलं भोजन खावं यासाठी आर्जवं केली जाते. हे सांगण्याचं कारण असं की हिंदू पंचागानुसार सध्या पितृ पक्ष सुरू झाला आहे. या पंधरा दिवसांच्या काळात पूर्वजांचे श्राद्ध (Shradh) घातले जाते. श्राद्धकर्मात कावळ्याचे विशेष महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांचे आत्मे (Ancestor’s Souls) या कावळ्याच्या रूपातून येतात आणि भोजन जेवून तृप्त होतात. त्यांच्या आत्म्याला शांती लाभते अशी श्रद्धा हिंदू धर्मात आहे. अशाच एका श्राद्ध कर्मादरम्यान, काळ्या नव्हे तर पांढऱ्या कावळ्यानं (White Crow) हजेरी लावल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गुजरातमधील (Gujrat) गांधीनगर (Gandhinagar) जिल्ह्यातील दहेगाम तालुक्यातील धारिसाना गावात (Dharisana Village) हा दुर्मीळ पांढरा कावळा आढळला असून, या कावळ्याला बघण्यासाठी बाहेर गावाहून लोक गावात येऊ लागले आहेत. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. साधारण 20 दिवसांपूर्वी पहिल्यांदा हा कावळा एका चहाच्या दुकानाजवळ आढळल्याचे धारिसानाचे सरपंच शैलेश पटेल यांनी सांगितलं. ते दररोज पक्ष्यांना शेव आणि गाठी देतात. अचानक एक दिवस त्यांना शेव, गाठी खाण्यासाठी येणाऱ्या कावळ्यांमध्ये हा पांढरा कावळा दिसला. तो कावळ्यांच्या समूहापासून दूर असलेला दिसत होता. कदाचित इतर काळ्या कावळ्यांनी त्याला आपल्यात घेतलं नसावं, असं पटेल यांनी सांगितलं. कारमधून बाहेर आलं अस्वल अन्...; VIDEO मध्ये पाहा कशी झाली महिलेची अवस्था ही बातमी ऐकून अहमदाबादमधील (Ahmedabad) आरोग्य क्षेत्रातील एका संस्थेत काम करणारा आणि दुर्मिळ पक्षी, प्राण्यांचे फोटो काढण्याचा छंद असलेला निमेश नाडोलिया (Nimesh Nadolia) आपला मित्र हर्ष डोडिया याच्यासोबत (Harsh Dodia) त्या गावात पोहोचला. या पांढऱ्या कावळ्याचे अनेक फोटो काढून त्यांनी ते सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यामुळे हा पांढरा कावळा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. तज्ज्ञांच्या मते 10 हजार कावळ्यांमध्ये एखादा असा पांढरा कावळा आढळतो. जनुकीय विकारामुळे कावळ्यांमध्ये अल्बिनिझम (मेलॅनिनची अनुपस्थिती) किंवा ल्यूसिझम (पंखांमध्ये रंगद्रव्य साठवण्याची कमतरता) हा प्रकार आढळतो. गांधीनगरमधील इंद्रोदा पार्कमधील (Indroda park) पशुवैद्यकीय तज्ज्ञांनीही (Veterinary Doctor) याला दुजोरा दिला. मेलॅनिन (Melanin) या त्वचेला रंग देणाऱ्या घटकाच्या कमतरतेमुळे असे घडते. अशा प्रकारचे कावळे अत्यंत दुर्मीळ असून, संपूर्ण गुजरातमध्ये फक्त एक किंवा दोन असे पांढरे कावळे असण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलं. ‘प्राणी, पक्षी पांढरे दिसण्यामागे कारणीभूत असलेले अल्बिनिझम (Albinism) आणि ल्युसीझम (Leucism) हे दोन भिन्न अनुवंशिक प्रकार असून, डोळ्यांच्या रंगावरून नेमकी कोणती कमतरता आहे हे स्पष्ट होते. पक्ष्याचे डोळे लालसर असतील, तर त्याला अल्बिनिझम असतो आणि डोळ्यांचा रंग सामान्य असेल तर त्याला ल्युसीझम असतो,’ असं पक्षीशास्त्रज्ञ भरत जेठवा यांनी सांगितलं. सध्या या दुर्मीळ कावळ्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सोशल मीडियावर तो ही चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. पितृपक्षात तर त्याचं महत्त्व अजूनच वाढण्याची शक्यता आहे.
First published: