Home /News /viral /

87 वर्षीय कोरोना पीडितासाठी 20 वर्षीय डॉक्टर झाला बाबा, रुग्णाचा हट्ट पुरवला

87 वर्षीय कोरोना पीडितासाठी 20 वर्षीय डॉक्टर झाला बाबा, रुग्णाचा हट्ट पुरवला

87 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा असा काय हट्ट होता जो विनाशर्त डॉक्टरांनी पूर्ण केला वाचा सविस्तर

    वुहान, 08 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या सगळ्यामध्ये एका 87 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णानं डॉक्टरकडे हट्ट केला आहे. हा हट्ट या डॉक्टरांनी विनशर्त पुरवल्यानं याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सोशल मीडियावर या रुग्णाची इच्छा पूर्ण करतानाचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या डॉक्टरनं अनेक अनेक सोशल मीडिया युझर्सचं मन जिंकलं आहे. त्याचं तुफान कौतुक केलं जात आहे. हा फोटो चीनमधला आहे. वुनहा इथल्या रुग्णालयाबाहेर सूर्यास्त बघत असल्याचा हा फोटो आहे. या फोटोवरील कॅप्शनही मनाला भिडणारं आहे. सिटीस्कॅनला जाण्याआधी या रुग्णाला सूर्यास्त पाहण्याची फार इच्छा झाली. त्याने डॉक्टरांजवळ आपला हा हट्ट बोलून दाखवला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी या रुग्णाचा हट्ट पूर्ण केला आहे. हे वाचा-कोरोनाची इडा पीडा टळू दे, शिर्डीत महिलांनी सर्व शहरा भोवती काढली पीठाची रांगोळी 'वुहानमधील यूएनआई रुग्णालयात 20 वर्षांच्या एका डॉक्टरने 87 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाला सिटीस्कॅनसाठी घेऊन जात होते. त्यावेळी या रुग्णानं सूर्यास्त पाहण्यासाठी हट्ट धरला. डॉक्टरांनी त्यांची इच्छा पूर्ण करत दोघांनीही सूर्यास्ताचा आनंद घेतला. हा रुग्ण एक महिन्यापासून रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हा फोटो जसा व्हायरल झाला तसं सोशल मीडियावर या पोस्टवर युझर्सनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. हे वाचा-कोरोनापासून वाचण्यासाठी आता पोलिसांनीच घातलं हेलमेट, VIDEO VIRAL
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या