Home /News /viral /

कोट्यवधींची इन्फोसिस उभारणाऱ्या सुधा मूर्तींच्या साधेपणाची पुन्हा चर्चा, भाजी विकतानाचा PHOTO VIRAL

कोट्यवधींची इन्फोसिस उभारणाऱ्या सुधा मूर्तींच्या साधेपणाची पुन्हा चर्चा, भाजी विकतानाचा PHOTO VIRAL

सुधा मूर्ती या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून त्यांची पुस्तकेही खूप वाचली जातात.

    मुंबई, 13 सप्टेंबर : त्याग, साधेपणा, कर्तव्यपरायण, आदर्श आणि लाखो लोकांचे प्रेरणास्त्रोत सुधा मुर्ती यांचे नाव सर्वांनाच परिचित आहे. आज सोशल मीडियावर त्यांचं नाव ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोत सुधा मुर्ती भाज्या विकत असताना दिसत आहेत. सुधा मूर्ती आयटी सेक्टरच्या सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहे. मात्र त्यांची ओळख इतकीच नाही, ही कंपनी उभी करण्यासाठी सुधा मुर्तींनी ( इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींची पत्नी) त्याग आणि परिश्रमांची पराकाष्ठा पार केली होती. सुधा मुर्तींची आतापर्यंत 92 पुस्तकं साधारणपणे सर्व भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर सुधा मुर्तींचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते एका भाज्यांच्या दुकानात बसले आहेत. या फोटोबाबत सोशल मीडिया युजर्सने सांगितले की, सुधा मुर्ती वर्षाच्या एक दिवशी भाजी विकतात. हा तेव्हाचा फोटो आहे. सुधा मुर्ती तरुणांचं प्रेरणास्त्रोत आहे. त्यांची पुस्तकेही तरुणांमध्ये बरीच प्रसिद्ध आहे. या पोस्टवर वापरकर्त्याने लिहिले आहे की, कोटींची मालकीण असतानाही इतकं साधं आयुष्य जगणं सोपं नाही. मात्र सुधा मुर्ती यांचं व्यक्तित्वही असंच आहे. हे ही वाचा-पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? दोन वेगवेगळ्या कोरोना रिपोर्टमुळे नागरिकांचं टेंशन वाढलं त्याग आणि साधेपणाचं दुसरं नाव सुधा मुर्ती (Sudha Murthy) आहे. सुधा मुर्ती पहिल्यांदा TELCO (टेल्को) कंपनीत इंजीनियरिंग काम करीत होते. मुर्ती या पुणेस्थित टेल्कोमध्ये काम करणारी एकमात्र महिला होती. टेल्को कंपनीत नोकरी मिळण्याचीदेखील एक वेगळीच कथा आहे. लग्नापूर्वी त्याचं नाव सुधा कुलकर्णी होतं..त्यानंतर नारायण मुर्ती यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव सुधा मुर्ती झालं. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी स्वत: ही गोष्ट सांगितली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या