Home /News /viral /

डोळ्यात पाणी अन् हातात Violin असलेल्या चिमुकल्याचा Photo व्हायरल; फोटोमागील कथा वाचून व्हाल भावुक

डोळ्यात पाणी अन् हातात Violin असलेल्या चिमुकल्याचा Photo व्हायरल; फोटोमागील कथा वाचून व्हाल भावुक

Emotional Photo Viral: हे छायाचित्र 2-3 लहान मुलांचे आहे, जे व्हायोलिन वाजवताना दिसत आहेत. यामध्ये एक मुलगा रडताना दिसत आहे

    नवी दिल्ली 20 डिसेंबर : गरिबी आणि गुन्हेगारी आजच्या काळात शापापेक्षा कमी नाही. काही लोकांचा असा विश्वास आहे की समाजात गरिबी हा शाप आहे, जो प्रत्येक गुन्ह्याला जन्म देतो. ही बाब पूर्णपणे खरी नाही. मात्र पालकांचं लक्ष नसणं आणि चुकीच्या संगतीमुळे काही वेळा मुलं गुन्हेगारीच्या मार्गावर जातात. आता मुलं गुन्हेगारीच्या मार्गावर जाऊ नयेत यासाठी जगभरात अनेक संस्था कार्यरत आहेत. काही लोक असेही आहेत ज्यांना या मुलांचे हाल पाहावत नाहीत आणि ते त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. सध्या याच्याशी संबंधित एक छायाचित्र सोशल मीडियावर खूप व्हायरल (Emotional Photo Viral on Social Media) होत आहे. या फोटोची कहाणी जाणून तुम्ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे डोळेही भरून येतील. आईस्क्रीम विकणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू, अनोख्या अंत्ययात्रेनं भारावलं वातावरण खरं तर, हे छायाचित्र 2-3 लहान मुलांचे आहे, जे व्हायोलिन वाजवताना दिसत आहेत. यामध्ये एक मुलगा रडताना दिसत आहे. खरं तर, तो मुलगा ब्राझीलचा आहे, जो आपल्या शिक्षकाच्या अंत्यसंस्कारात रडत रडतच व्हायोलिन वाजवत आहे (Boy Playing Violin at Funeral of Teacher). आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे आणि व्हायोलिन वाजवत पडणाऱ्या मुलाची कथाही सांगितली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'हे छायाचित्र ब्राझिलियन मुलाचे (डिएगो फ्राजो टर्काटो) आहे. तो त्याच्या शिक्षकाच्या अंत्यसंस्कारात व्हायोलिन वाजवत आहे. या शिक्षकाने त्याला गरिबी आणि गुन्हेगारीतून बाहेर काढले होते.' त्यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, 'या फोटोत माणुसकी जगातील सर्वात मजबूत आवाजात बोलत आहे'. अनेकांना हे छायाचित्र आवडलं आहे. अवनीश शरणने पोस्ट केलेल्या या फोटोला आतापर्यंत ४ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी या पोस्टवर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं की, 'या ब्राझिलियन मुलाचे त्याच्या दिवंगत शिक्षकाच्या अंत्यसंस्कारातील हे छायाचित्र आमच्या काळातील सर्वात भावनिक चित्रांपैकी एक म्हणून वर्गीकृत केलं गेलं आहे. घरात एकटा असताना नवऱ्याचा 'नको तो उद्योग'; CCTV फुटेज पाहून बायकोही शॉक याशिवाय आणखी एका यूजरने कमेंट केली आहे की, 'सामान्यतः या जगात फक्त शिक्षकांमध्येच संपूर्ण मानवतेला वाचवण्याची क्षमता असते', तर आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, 'त्याचे डोळे सांगत आहेत की त्याचं हृदय पूर्णपणे तुटलं आहे'. हृदयद्रावक चित्र.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Emotional, Viral photo

    पुढील बातम्या