मराठी बातम्या /बातम्या /Viral /

PHOTO : जवळ असून हरणांनाही दिसला नाही, तुम्हाला सापडतोय का बघा; शिकारीसाठी दबा धरून बसलाय चित्ता

PHOTO : जवळ असून हरणांनाही दिसला नाही, तुम्हाला सापडतोय का बघा; शिकारीसाठी दबा धरून बसलाय चित्ता

हरणांची शिकार करण्यासाठी दबा धरून बसला आहे चित्ता.

हरणांची शिकार करण्यासाठी दबा धरून बसला आहे चित्ता.

हरणांची शिकार करण्यासाठी दबा धरून बसलेल्या चित्त्याला शोधण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे.

  • Published by:  Priya Lad
 मुंबई, 12 ऑगस्ट : प्राण्यांचे बरेच व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्राण्यांच्या हल्ल्याचे तर तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. प्रत्येक प्राण्यांची शिकार करण्याची तशी एक वेगळी स्टाईल असते. पण बहुतेक प्राणी समोरच्याला बेसावध ठेवून संधी मिळताच डाव साधतात. ज्याची शिकार होणार आहे, त्यालाही त्याच्यावर येणाऱ्या संकटाची माहिती नसते. अशाच शिकारीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात हरणांची शिकार करण्यासाठी एक चित्ता दबा धरून बसला आहे. ज्याला शोधण्याचं चॅलेंज तुमच्यासमोर आहे. वाइल्डलाइफ फोटोग्राफर रिचर्ड कॉस्टिनने हा फोटो क्लिक केला आहे. केन्याच्या मसाई मारा जंगलातील हे दृश्य आहे. जिथं आपल्याला फक्त हरणांचा कळप दिसतो. दूरदूरपर्यंत दुसरा कोणताच प्राणी दिसत नाही. फोटोग्राफरच्या मते, हरणांचा कळप तिथं आला. त्यांच्या शारीरिक हालचालीवरून ते घाबरल्याचे दिसत होते. पण त्यांच्या भीतीचं, चिंतेचं कारण समजत नव्हतं. अखेर ते कारण कॅमेऱ्यात कैद झालं. हे वाचा - Optical Illusion: फक्त 30 सेकंदात शोधून दाखवा या पानात लपलेला किडा हरणांची शिकार करण्यासाठी आलेला चित्ता त्यांच्या खूप जवळ आहे. पण त्या हरणांनाही तो दिसला नाही. फोटोग्राफरलाही बऱ्याच मेहनीतनंतर  दबा धरून बसलेल्या या चित्त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करता आलं. आता त्याच चित्त्याला शोधण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे. हा फोटो पाहिल्यानंतर त्यात आपल्यालाही सहजासहजी चित्ता दिसत नाही. चित्ता अशा ठिकाणी आणि अशा पद्धतीने लपला आहे की तो पटकन दिसत नाही. त्यासाठी एखाद्याची नजर गरूडासारखीच असायला हवी.  आता तुमची नजर गरूडासारखी आहे की नाही हे तुम्ही या चित्त्याला शोधून दाखवल्यावरच समजेल. काय मग तुम्ही हे चॅलेंज घ्यायला तयार आहात का? चला तर मग हा फोटो पाहा आणि त्यात चित्त्याला शोधा. तुम्हाला सापडला हा चित्ता. सापडला तर आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा. हे वाचा - Optical Illusion : ‘या’ फोटोमध्ये दडलीय एक खतरनाक मगर; दहा सेकंदांत सापडते का पाहा आता तुम्ही जो अंदाज बांधला तो बरोबर होता की नाही हे तुम्हाला कसं समजेल? तर यासाठी ही स्टोरी पुढे वाचा. तुमचा अंदाज योग्य होता की नाही तेसुद्धा तुम्हाला समजेल आणि चित्ता नेमका कुठे लपून बसला आहे तेसुद्धा दिसेल. उजव्या बाजूला नीट पाहा. गवतांच्या मध्ये एक वेगळीच आकृती दिसेल. ही आकृती म्हणजेच चित्ता आहे. काही क्षणातच हा चित्ता हरणांवर हल्ला करतो आणि हरणं आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसतात. आता ही बातमी इतरांसोबत शेअर करा आणि त्यांनाही या फोटोतील शिकारी शोधण्याचं चॅलेंज द्या.
First published:

Tags: Viral, Viral photo, Wild animal

पुढील बातम्या