मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कलिंगडासारखा फुलला चेहरा, नजरेतही होती आक्रमकता; डॉक्टरने सांगितलं पाळीव श्वानाबाबत खतरनाक सत्य

कलिंगडासारखा फुलला चेहरा, नजरेतही होती आक्रमकता; डॉक्टरने सांगितलं पाळीव श्वानाबाबत खतरनाक सत्य

डॉक्टरला श्वानाचा फोटो पाठवताच त्याच्याबाबत जे सत्य समोर आलं ते ऐकून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली.

डॉक्टरला श्वानाचा फोटो पाठवताच त्याच्याबाबत जे सत्य समोर आलं ते ऐकून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली.

डॉक्टरला श्वानाचा फोटो पाठवताच त्याच्याबाबत जे सत्य समोर आलं ते ऐकून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली.

  • Published by:  Priya Lad
बीजिंग, 20 जुलै : नुकतंच एका वृद्ध महिलेला पाळीव श्वानाने जीव घेतल्याने सर्वांमध्येच डॉगबाबत दहशत निर्माण झाली आहे. अशात सध्या एका श्वानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात या श्वानाचा चेहरा कलिंगडासारखा फुगलेला दिसतो. तसंच त्याच्या नजरेत आक्रमकताही दिसते. या श्वानाचा मालकही त्याला पाहून घाबरला. त्याने प्राण्यांच्या डॉक्टरांना याबाबत विचारलं तेव्हा त्यांनी जे कारण सांगितलं ते ऐकून त्याला धक्काच बसला. चीनच्या अन्हुई शहरातील एका व्यक्तीकडे हस्की ब्रीडचा पेट डॉग आहे. ज्याचं नाव सुएबी असं आहे. या डॉगमध्ये झालेला बदल पाहून ती व्यक्ती घाबरली. त्याचा चेहरा सुजला होता आणि तो खूप रागात होता. तो घरात यायलाही तयार नव्हता. घराबाहेरच सुस्त पडला होता. भीतीने त्याने त्याचा फोटो काढला, तेव्हाही तो त्याच्याकडे आक्रमकपणे पाहत होता. हे वाचा - Pitbull सारख्या खतरनाक Dog Attack मध्ये कसा वाचवाल स्वतःचा जीव; पाहा हा VIDEO अखेर त्याने त्याचा फोटो काढून प्राण्याच्या डॉक्टरला पाठवला. डॉक्टरांना फोटो पाठवताच श्वानाबाबत धक्कादायक सत्य समोर आलं.  डॉक्टरांनी त्याला कुत्र्याच्या सुजलेल्या चेहऱ्याचं जे कारण सांगितलं ते ऐकून तो शॉक झाला. त्याच्या श्वानाला एका विषारी सापाने दंश केला होता. ज्यामुळे त्यााच चेहरा माणसाच्या चेहऱ्याच्या डबल एका कलिंगडासारखा झाला होता.  त्याच्या मालकाने तात्काळ त्याला डॉक्टरांकडे नेलं आणि त्याला अँटीवेनम दिलं. हे वाचा - कसं शक्य आहे? 15 दिवसांत 3 वेळा साप चावला तरी 12 वर्षांचा मुलगा एकदम ठणठणीत; डॉक्टरही हैराण मालकाने कुत्र्याच्या सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो शेअर केल्याच्या तीन दिवसांनंतर त्याच्याबाबत अपडेट दिली. जसजसा विषाचा प्रभाव कमी झाला तसा त्याचा चेहरा सामान्य झाला. त्याच्या चेहऱ्याची सूज आता कमी झाली असून तो नॉर्मल झाल्याचं त्याने सांगितलं.
First published:

Tags: Dog, Viral, Viral news

पुढील बातम्या