मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Dog Video - जिथं चाटला विचित्र जीव तिथं हुंगताच श्वानाचा मृत्यू; काही क्षणातच तडफडून तडफडून झाला मृत्यू

Dog Video - जिथं चाटला विचित्र जीव तिथं हुंगताच श्वानाचा मृत्यू; काही क्षणातच तडफडून तडफडून झाला मृत्यू

विचित्र जीवामुळे श्वानाच्या झालेला मृत्यू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

विचित्र जीवामुळे श्वानाच्या झालेला मृत्यू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

विचित्र जीवामुळे श्वानाच्या झालेला मृत्यू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Viralimalai, India
  • Published by:  Priya Lad

पाटणा,16 जुलै : नुकतीच एका श्वानाने एका महिलेचा जीव घेतल्याच्या बातमीने खळबळ उडवली आहे. त्यात आता एका श्वानाच्या मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका पाळीव कुत्र्याचा रहस्यमयी मृत्यू झाला आहे. एका विचित्र जीवाने जिथं चाटलं होतं, तिथं हुंगताच कुत्र्याचा जीव गेला. काही क्षणात तिथंच त्याचा तडफडून मृत्यू झाला (Pet dog died after smelling poisonous creature).

कुत्र्याच्या मृत्यूचं हे भयंकर दृश्य घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. जेव्हा मालकाने सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा त्याला धक्काच बसला. सीसीटीव्हीमध्ये सुरुवातीला एक विचित्र प्राणी दिसला. या प्राण्यामुळेच त्याच्या लाडक्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या पूर्णियातील कृत्यानंद नगरमधील ही घटना आहे. परोरा वास्तू विहारमधील हे भयंकर दृश्य आहे.

हे वाचा - विचित्र जीवाने सर्फिंग बोटला दिला धक्का, तरुण पाण्यात पडताच...; थरकाप उडवणारा VIDEO

या श्नानाचा मालक राजीव राज यांनी सांगितलं, जेव्हा ते सकाळी उठले तेव्हा त्यांना घरासमोर त्यांचा पाळीव कुत्रा लुसी मृतावस्थेत दिसला. जेव्हा त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तेव्हा त्यांना त्यात एक विचित्र जीव दिसला. हा प्राणी गेटच्या आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला पाहून कुत्रा तिथं गेला. कुत्र्याला पाहताच तो प्राणी तिथून पळून पुन्हा मागे गेला.

" isDesktop="true" id="732605" >

व्हिडीओत पाहू शकता एक मोठ्या उंदरासारखा दिसणारा हा काळा प्राणी आहे. जो गेटला चाटताना दिसतो आहे. थोड्यावेळाने तो तिथून पळून जातो आणि तिथं कुत्रा येतो. कुत्रा त्या प्राण्याला शोधत असतो. त्यानंतर गेटला जिथं तो प्राणी चाटला तिथंच हा कुत्रा हुंगायला गेला. तिथून तो मागे आला आणि तडफडू लागला. जागच्या जागीच त्याने जीव सोडला. हे सर्वकाही काही मिनिटांतच घडलं आहे.

हे वाचा - VIDEO - भुकेल्या अजगराने जबड्यात कोंबले 2 ससे आणि एक कोंबडा; शेवटी तडफडून तडफडून...

राजीव यांच्या मते, तज्ज्ञांनी या प्रकरणाचा तपास करायला हवा. जेणेकरून आणखी कुणी या विचित्र विषारी प्राण्याचा शिकार होऊ नये. हा विचित्र प्राणी कोण आहे हे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Dog, Other animal, Viral, Viral videos, Wild animal