मराठी बातम्या /बातम्या /Viral /Made in china कोरोना लस घेतली आणि भाषाच बदलली; विचित्र दुष्परिणामाचा VIDEO VIRAL

Made in china कोरोना लस घेतली आणि भाषाच बदलली; विचित्र दुष्परिणामाचा VIDEO VIRAL

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

कोरोना लस (corona vaccine) घेतलेल्या व्यक्तीनं आपला अनुभव मांडला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झाला.

बीजिंग, 05 फेब्रुवारी : भारतासह जगातील काही देशांमध्ये कोरोना लसीकरण (corona vaccination) सुरू झाले आहे. कोरोना लशीचे काही दुष्परिणामही (corona vaccine side effect) समोर आले आहेत. पण हे दुष्परिणाम तसे फार गंभीर नसल्याचं सांगितलं जातं आहे. असं असताना सध्या सोशल मीडियावर (social media) असा व्हिडीओ (video) व्हायरल (viral) होतो आहे. ज्यामध्ये मेड इन चायना कोरोना लशीचा (made in china corona vaccine) विचित्र दुष्परिणाम समोर आला आहे. ही लस घेतली आणि एक व्यक्ती दुसरीच भाषा बोलू लागला.

बिझनसमन हर्ष गोयंका (Businessman Harsh Goenka) यांनी आपल्या ट्विटवरवर कोरोना लसीकरणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओत एक फोटो दिसतो आहे. ज्यामध्ये एका बाजूला इंजेक्शन आणि एका बाजूला एका व्यक्तीचा फोटो आहे. या व्हिडीओत आवाज ऐकू येत आहे. कोरोना लस घेतल्यानंतरचा अनुभव या ऑडिओतून ऐकायला मिळतो आहे. ऑडिओत तुम्हाला ऐकायला मिळेल की, "कोरोना लस घेतल्यानंतर मला तात्काळ कोणताही दुष्परिणाम झाला नाही पण हळूहळू... असं म्हणताच त्या व्यक्तीचा आवाज आणि चेहराही बदलतो"

हे वाचा - कोरोना लसीकरणात मोठा घोटाळा; आरोग्य कर्मचाऱ्यांचा यादीत डॉक्टरांचेच आप्तेष्ट

हर्ष गोयंका यांनी हा व्हिडीओ एका मजेशीर पद्धतीनं शेअर केला आहे. 'चिनी लशीचा दुष्परिणाम' असं कॅप्शन त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना दिलं आहे.  हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

First published:

Tags: China, Corona vaccine, Viral