अबब! 3280 फूट उंचीवर उडणाऱ्या फुग्यावर केला डॉन्स! 'त्यानं' बनवला नवा रेकॉर्ड

अबब! 3280 फूट उंचीवर उडणाऱ्या फुग्यावर केला डॉन्स! 'त्यानं' बनवला नवा रेकॉर्ड

समुद्र उंचीपासून 3280 फूट उंचीवर या तरूणानं चक्क फूग्यावर डान्स केला. फुग्यावर डान्स करत त्यानं नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

  • Share this:

पॅरिस, 25 फेब्रुवारी : जगभरात आपली ओळख निर्माण करण्यासाठी लोक अनेकदा आपल्या जीवाशी खेळ करतात. अनेकदा प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोटी कोणी न केलेली स्टंटबाजी केली जाते. अशाच एका अत्रंगी उद्योगाचा VIDEO सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. एका इसमाने तर चक्क फुग्यावर चढून डान्स केला आहे. हा फक्त फुग्यावरचा डान्स नाही, तर तब्बल 3280 फूट उंचीवर उडणाऱ्या फुग्यावर नाचून त्यानं आपल्या नावावर नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

पश्चिम फ्रान्समध्ये हॉट एयर ब्लूनवर चढून डान्स करणाऱ्या या व्यक्तीनं नाव आहे रेमी ऑवरार्ड असं आहे. या व्यक्तीनं थोड्या थोडक्या उंचीच्या फुग्यावरून डान्स केला असता तर ठिक होतं रावं पण या इसमान समुद्र उंचीपासून तब्बल 3280 फूट उंच फुग्यावर चढून हा डान्स केलाय. या फुग्यावर एक मेटलची खुर्ची ठेवण्यात आली होती. या खुर्चीवर चढून त्यानं डान्स केला आहे. बर या खुर्चीवर चढून डान्स जमिनीवर करण सोपं आहे हो पण हाच डान्स त्यानं चक्क हवेच उडणाऱ्या फुग्यावर चढून केला आहे.

अनेकदा अशी स्टंटबाजी करण्यासाठी आपल्याला पालकांचा विरोध असतो मात्र याच्या केसमध्ये थोडं वेगळं आहे. हा इसम ज्या फुग्यावर चढून नाचत होता. तो फुगा त्याचे बाबाचं चालवत होते.

26 वर्षाच्या रेमीनं 3280 फूट उंचीच्या फुग्यावर चढून डान्स केला आहे. त्यानं या फुग्यावर मेटलची खुर्ची ठेवून त्यावर बसून वेगवेगळी प्रात्यक्षिकं देखिल केली आहे. इतक्या उंचावर जावून हॉट बलुनवर आत्तापर्यंत कोणीही डान्स केलेला नसल्यानं त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

रेमी ऑवरार्डनं सांगितलं या फुग्यावर चढून डान्स करणं कठीण झाल होतं. फुग्यावर चढत असताना जेव्हा त्यात हवा भरली जात होती तेव्हा त्याला सर्वात जास्त त्रास झाला होता. त्याचावर बॅलन्स करण फार कठीण झाले होते. रेमीनं हा अनुभव आयुष्यातला सर्वात भारी अनुभव असल्याचं म्हटलं आहे. याआधी २०१६ मध्ये स्काई ड्रिफ्टर्स हॉट एयर बलूनवर डान्स करणाऱ्या एका व्यक्तीनं अशाच प्रकाराचा व्हिडिओ शेअर केला होता.

First published: February 26, 2020, 8:03 AM IST

ताज्या बातम्या