मुंबई, 1 मार्च : सोशल मीडियावर अनेक मजेदार गोष्टी रोज व्हायरल होत असतात. या गमतीदार गोष्टी लोकांचा दिवस मस्त बनवतात. अनेकदा या गोष्टी हसवता-हसवता हळवंसुद्धा करतात. (animal viral video on social media)
सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेदार व्हिडिओ अनेकांना आवडतो आहे. एक गाय आणि एक व्यक्ती यांचा हा व्हिडिओ आहे. हा व्यक्ती गायीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याच्या प्रयत्नात आहे. गायीला नेण्यासाठी खरंतर ट्रॉली किंवा ऑटोचा वापर केला पाहिजे. मात्र इथं ही व्यक्ती वेगळंच काही करते आहे. (cow funny video)
ही व्यक्ती गायीला चक्क कारमध्ये बसवून नेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि हा प्रयत्न यशस्वीही झाला. व्यक्ती बिचारा कारच्या मागे लटकून गायीला सांभाळत होता. हा पोट धरून हसायला लावणारा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केला आहे. (cow sat in a car video)
अब तक का सबसे ‘सॉलिड’ जुगाड़.😅 pic.twitter.com/8C9phPmam0
— Awanish Sharan (@AwanishSharan) February 27, 2021
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की 7 सीटर कारच्या मागच्या भागात गाय आहे. ही गाय मान बाहेर काढून पाहते आहे. मागे एक व्यक्ती उभा आहे. तो गायीला सांभाळतो आहे. दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीनं हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. कारमध्ये समोरच्या भागात लोक बसलेले आहेत. मागच्या भागात गायसुद्धा मजेत बसलेली आहे. (IAS officer cow video)
हेही वाचा या सेलिब्रिटीचे 2 Dogs चोरीला; जो शोधेल त्याला मिळणार तब्बल 3 कोटी
हा व्हिडिओ शेअर करताना अवनीश शरण यांनी कॅप्शन दिली, 'आजवरचा सर्वात सॉलिड जुगाड.' हा व्हिडिओ शेअर केला गेला 27 फेब्रुवारीला. मात्र आतापर्यंत हा व्हिडिओ 23 हजारांहून जास्त लोकांनी पाहिला आहे. (cow in car viral video)
हेही वाचा छोट्याशा मैत्रिणीचा बॉल मिळवण्यासाठी कुत्र्यानं केलं असं काही, नेटकरी झाले भावुक
या व्हिडिओला दोन हजारांहून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. लोकांनी एकाहून एक मजेदार कमेंट्सही या व्हिडिओवर केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Twitter, Viral video.