बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं! Dinner ची करीत होता तयारी, मात्र...पाहा VIDEO

बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं! Dinner ची करीत होता तयारी, मात्र...पाहा VIDEO

एका वाघाने पर्यटकांच्या सफारी वाहनावर हल्ला (Tiger attack on van) केला होता. त्यानंतर प्रवासीही पुरते घाबरुन गेले होते

  • Share this:

बंगळुरू, 17 जानेवारी: बंगळुरू येथील बन्नेरघाट्टा राष्ट्रीय उद्यानात एका वाघाने पर्यटकांच्या सफारी वाहनावर हल्ला केला आहे. यावेळी यातीलच एका पर्यटकानं या वाघाचा व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, वाघ पर्यटकांची गाडी खेचताना दिसत आहे. परंतु सर्व पर्यटक गाडीत सुरक्षित असल्यामुळे वाघाचा रात्रीच्या जेवनाचा प्लॅन फसला आहे.

दीड मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बेंगॉल टायगर पाठीमागून कसा कार खेचत आहे. यावेळी या कारमध्ये काही लोकं बसलेली आहेत. असं असतानाही या वाघानं गाडी खेचण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. तसेच त्याने ही कार काही अंतर पाठीमागे खेचली देखील. त्यामुळे कारचा मागील काही भागदेखील खराब झाला आहे.

हा व्हिडीओ मोना पटेल नावाच्या एका ट्वीटर वापरकर्त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, आपण पाहू शकता की, वाघ कसा आपल्या पंजानी आणि दातांनी कार ओरखडण्याचा प्रयत्न करत आहे. वाघ आपल्या सर्व ताकदीने वाहन मागे खेचत आहे. यावेळी काही अंतर मागच्या बाजूला खेचले देखील. या व्हिडीओत आणखी एक वाघ दूरवरुन हळूहळू गाडीकडे येताना दिसत आहे.

बेंगळुरूच्या बन्नेरघाट्टा राष्ट्रीय उद्यानात या व्हिडीओचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. ही व्हिडीओ क्लिप ट्वीटरवर खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ  15 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला एक हजाराहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. शिवाय या व्हिडीओवर बर्‍याच जणांनी विनोदी कमेंट्स देखील केल्या आहेत.

Published by: News18 Desk
First published: January 17, 2021, 7:25 PM IST

ताज्या बातम्या