मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: देव तारी त्याला कोण मारी! गच्चीत उभा असताना गेला तरुणाचा तोल; लोकांच्या प्रसंगावधानामुळे टळली दुर्घटना

VIDEO: देव तारी त्याला कोण मारी! गच्चीत उभा असताना गेला तरुणाचा तोल; लोकांच्या प्रसंगावधानामुळे टळली दुर्घटना

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक एका इमारतीच्या गच्चीमध्ये थांबलेले आहेत. काही वेळातच यातील एक व्यक्ती इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळतो (Youth Fell Down From First Floor) .

नवी दिल्ली 19 मार्च : देव तारी त्याला कोण मारी हे वाक्य अनेकदा आपण ऐकलं असेल. अनेकदा असे प्रसंग आपल्यासमोर घडतात ज्यातून समोरची व्यक्ती बचावेल असं वाटत नाही मात्र तरीही ती व्यक्ती यातून सुखरुपणे बाहेर येते. ही गोष्ट आसपासच्या सगळ्यांसाठीच आश्चर्याची ठरते. अनेकदा या घटनांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक एका इमारतीच्या गच्चीमध्ये थांबलेले आहेत. एका कार्यालयाबाहेर ते वाट पाहात असल्याचं व्हिडीओवरुन लक्षात येत आहे. गच्चीमध्ये तीन ते चार जण उभे आहेत. काही वेळातच तिथे उभा असणाऱ्या एका व्यक्तीचा डोळा लागतो आणि तोल जातो. हा व्यक्ती इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळतो (Youth Fell Down From First Floor). मात्र, तितक्यात आजूबाजूला असणारे लोक प्रसंगावधान राखत ताबडतोब त्या व्यक्तीचे पाय पकडतात आणि त्याला पडण्यापासून वाचवतात (Group of People Saving a Youth). हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये (CCTV Footage) कैद झाला आहे. ही घटना आहे केरळच्या कोझीकोडमधील वडाकारा येथील.

देव तारी त्याला कोण मारी हे वाक्य आम्ही का वापरलं हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर अनेकांनी हा व्हिडीओ (Video Viral) पाहिला आहे.

First published:

Tags: Cctv footage, Shocking news, Shocking viral video, Social media viral