Home /News /viral /

अंडी चोरण्यासाठी आलेल्या तरुणीला मोराने आधी धक्का देऊन खाली पाडलं; मग केला हल्ला, Shocking Video

अंडी चोरण्यासाठी आलेल्या तरुणीला मोराने आधी धक्का देऊन खाली पाडलं; मग केला हल्ला, Shocking Video

महिला लांडोरीची अंडी चोरण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतं. मात्र, यानंतर मोर तिला अशा पद्धतीने अद्दल घडवतो, की हा प्रसंग ती आयुष्यभर विसरणार नाही.

    नवी दिल्ली 26 मे : आई आणि वडिलांच्या प्रेमाची तुलना जगातल्या कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. आई-वडील आपल्या मुलाला अगदी बोलताही येत नाही, तेव्हापासून चांगल्या पद्धतीने ओळखत असतात. मग हे आई-वडील माणसाचे असो किंवा प्राण्याचे नाहीतर एखाद्या पक्षाचे, हे नातं नेहमीच खास असतं. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यायला तसंच आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी ते स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासही तयार असतात. हे केवळ मानवांनाच नाही तर प्राण्यांनाही लागू होतं. नुकताच अशाच एका मोराचा एक व्हिडिओ (Peacock Attack Video) व्हायरल होत आहे. कबुतराची शिकार करण्यासाठी धावलं मांजर...पण...पुढे जे घडलं ते बघून वाटेल आश्चर्य; बघा VIDEO यात एक महिला लांडोरीची अंडी चोरण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतं. मात्र, यानंतर मोर तिला अशा पद्धतीने अद्दल घडवतो, की हा प्रसंग ती आयुष्यभर विसरणार नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मोर बऱ्याच अंड्याच्या शेजारी बसलेला आहे. इतक्यात एक महिला आपल्या पायांचा आवाज न करता अगदी शांततेत तिथे पोहोचते आणि मोराला तिथून उचलून लांब फेकते. पुढे तुम्ही पाहू शकता की यानंतर तरुणी जमिनीवर असलेली लांडोरीची अंडी उचलू लागते. मात्र काहीच क्षणात मोर उडत पुन्हा तिथे येतो आणि तरुणीला जोरात धडक देतो. यानंतर ही तरुणी अचानक लागलेल्या या धक्क्यामुळे दूर उडून पडते. यानंतर मोर तिच्यावर हल्ला करू लागतो. हे दृश्य पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हे पाहून जाणवतं की यापुढे ही तरुणी चुकूनही कधी पक्षाच्या अंड्याला हात लावण्याचा प्रयत्न करणार नाही. चमत्कार! तिसऱ्या मजल्यावरून कोसळली पण साधं खरचटलंही नाही; दीड वर्षांच्या चिमुकलीला पाहून डॉक्टरही हैराण हा व्हिडिओ ट्विटरवर @issawooo नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत 15 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 1.11 लाखहून अधिकांनी लाईक केला आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, 'मोराने अंड्याची चोरी करणाऱ्या तरुणीला चांगलीच अद्दल घडवली'. आणखी एकाने लिहिलं, की प्राणीही आपल्या पिल्लांची इतकी काळजी घेतात, माणसांनीही त्यांच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे'. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral

    पुढील बातम्या