Home /News /viral /

‘पावरी हो रही है’ नंतर आता पावरी गर्लच्या 'बाप' व्हर्जनचा इंटरनेटवर धुमाकूळ, नवा VIDEO पाहिलात का?

‘पावरी हो रही है’ नंतर आता पावरी गर्लच्या 'बाप' व्हर्जनचा इंटरनेटवर धुमाकूळ, नवा VIDEO पाहिलात का?

‘ये हमारी कार है, ये हम हैं और ये हमारी पावरी (पार्टी) हो रही है’ म्हणून रातोरात सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या दाननीर मोबीनने 3 मार्चला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

  नवी दिल्ली 05 मार्च : पावरी गर्ल (Pawri Girl New Video) आजही सर्वांच्या लक्षात नक्कीच असेल. हीच तीच पाकिस्तानी तरुणी दाननीर मोबीन (Dananeer mobeen) आहे, जिच्या 'पावरी हो रही है' (Pawri Ho Rahi Hai New Version) व्हिडिओ इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सामान्य जनतेपासून कलाकारांपर्यंत सगळेच यावर रिल्स बनवून शेअर करत होते. आता दाननीर मोबीन परत आली आहे. तेदेखील आपल्या 'पावरी हो रही है'च्या नवीन व्हर्जनसोबत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ती अधिक कॉन्फिडंट आणि नवीन अंदाजा दिसते. हे व्हर्जनही लोकांच्या चांगलंच पसंतीस उतरत असून हे अतिशय विनोदी असल्याचं नेटकरी सांगत आहेत. VIDEO: पाळीव घोड्याचे लाड करत होती, पण अचानक त्याने केलं असं काही की शरमली तरूणी ‘ये हमारी कार है, ये हम हैं और ये हमारी पावरी (पार्टी) हो रही है’ म्हणून रातोरात सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या दाननीर मोबीनने 3 मार्चला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दनानीर मुबीन आपल्या व्हिडिओवर ट्रेंड झालेल्या एका लहान मुलीच्या व्हिडिओच्या ओळींवर लिपसिंक करताना दिसते. व्हिडिओमध्ये ती आपल्या वडिलांचा आणि भाऊ-बहिणीचा फोटो दाखवून म्हणते, 'हाय गाईज! ये मैं हूं और ये हमारा बाप है और ये हमारे बाप की पार्टी हो रही है'.
  दनानीरने हा व्हिडिओ शेअर करत त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, हॅलो मित्रांनो…या मुलीने ‘पावरी हो रही है’मध्ये मलाच मागे टाकलं आहे. पाहा पावरी हो रही हैंचं आतापर्यंतचं सर्वात बेस्ट व्हर्जन. यासोबतच लिहिलं, ओरिजनल व्हिडिओ पाहाण्यासाठी राईट स्वाईप करा. अपेक्षेप्रमाणेच दनानीरच्या या नव्या व्हिडिओनं पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तरुणाला कारची जबरदस्त धडक; बोनेटवरुन सिग्नलपर्यंत फटफटत नेलं, धक्कादायक Video दनानीरचा हा नवा व्हिडिओ लोकांच्या किती पसंतीस उतरत आहे, याचा अंदाज तुम्ही यावरन लावू शकता की अपलोड झाल्यानंतर काही तासातच 1 लाख 45 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. व्हिडिओ पाहून लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Video Viral On Social Media

  पुढील बातम्या