रेल्वेनं अचानक दिलं असं सरप्राईज की प्रवाशांचा आनंद गगनात मावेना; स्टेशनवरच करू लागले गरबा, VIDEO
रेल्वेनं अचानक दिलं असं सरप्राईज की प्रवाशांचा आनंद गगनात मावेना; स्टेशनवरच करू लागले गरबा, VIDEO
एक ट्रेन रतलाम रेल्वे स्थानकावर वेळेच्या अगोदर पोहोचली, त्यानंतर इथे एक अतिशय मनोरंजक दृश्य दिसलं. ट्रेन लवकर आल्याने लोकांनी अचानक आनंदाने उड्या मारल्या आणि गरबा करायला सुरुवात केली
नवी दिल्ली 27 मे : ट्रेन उशिरा आल्याने लोक निराश होऊन भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) सेवेवर आपला राग काढतात आणि बरंच काही बोलतात, हे चित्र तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. ट्रेन कधी वेळेआधी पोहोचली असेल असं फार क्वचितच घडल्याचं पाहायला मिळतं. मात्र हेच दुर्मिळ दृश्य नुकतंच मध्य प्रदेशातील रतलाममध्ये पाहायला मिळालं आहे. वास्तविक, एक ट्रेन रतलाम रेल्वे स्थानकावर वेळेच्या अगोदर पोहोचली, त्यानंतर इथे एक अतिशय मनोरंजक दृश्य दिसलं. ट्रेन लवकर आल्याने लोकांनी अचानक आनंदाने उड्या मारल्या आणि गरबा करायला सुरुवात केली (Garba at Railway Station).
VIDEO - इवल्याशा उंदरावर तुटून पडला श्वानांचा कळप; शेवटपर्यंत एकट्याने लढा दिला अखेर...
सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रेल्वे स्टेनशवर अनेक प्रवासी गरबा करताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 5 वर अनेक लोक गरबा करताना दिसत आहेत. स्टेशनवर ट्रेन सुमारे 20 मिनिट लवकर पोहोचली होती. याच आनंदात हे लोक गरबा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ रतलाम रेल्वे स्टेशनवरील आहे.
प्रवाशांनी गरबा करायला तेव्हा सुरुवात केली जेव्हा ब्रांदा-हरिद्वार ट्रेन बुधवारी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी वेळेच्या २० मिनिटं आधीच रतलाम स्टेशनवर पोहोचली. ही ट्रेन इथे दहा मिनिटं थांबते. यानंतर प्रवाशांच्या एका गटाने तिथेच गरबा डान्स सुरू केला. प्रवाशांच्या डान्सचा हा व्हिडिओ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कू अॅपवर शेअर केला. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, 'मजामा. हॅप्पी जर्नी'.
नवरदेवाच्या मित्रांचं गिफ्ट पाहून भडकली नवरी, पाहताच क्षणी फेकून दिलं; असं काय होतं पाहा VIDEO
मध्य प्रदेशच्या रतलाम स्टेशनवरील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये लोक गाण्यावर गरबा करताना दिसत आहेत. यामुळे पाहता पाहता रेल्वे स्टेशनवरील वातावरणच बदललं आणि अनेक लोक या डान्समध्ये सहभागी झाले. सध्या या व्हिडिओ नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळत आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.