• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बसच्या अपघातात स्कूटीवरील प्रवासी बचावले; मात्र मागून येणारी बाईक थेट दरीत, Shocking video

बसच्या अपघातात स्कूटीवरील प्रवासी बचावले; मात्र मागून येणारी बाईक थेट दरीत, Shocking video

या अपघाताचं एक CCTV फुटेज समोर आलं आहे.

 • Share this:
  हमीरपूर, 2 ऑगस्ट : आतापर्यंत सोशल मीडियावर वेगवेगळ्या अपघाताचे व्हिडीओ आपण पाहिले असेल. मात्र या व्हिडीओमध्ये ज्या गाडीचा अपघात झाला त्याच्या मागच्या गाडीवर याचा परिणाम झाला आहे. अनेकदा आगाडी चालवताना दुर्लक्ष झालं तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. मात्र समोरच्या गाडीचा अपघात झाला तर मागच्या गाडीवर त्याचा परिणाम दिसून येतो. भोरंग येथील बेगलजवळ वळणाच्या रस्त्यावरील एका दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, एक खासगी बस वळणाऱ्या रस्त्यावरुन जात आहे. त्याच वेळेस समोरुन एक दुचारी येत आहे. दरम्यान पुढे आल्यानंतर ती दुचाकी स्वार रस्त्यावर पडतात.  यावेळी दुचाकीच्या मागे बसलेली महिलादेखील खाली पडते. मात्र त्यांची स्कूटी मात्र दरीत कोसळते. त्याचवेळेस मागून येणाऱ्या बाईकचादेखील तोल बिघडतो आणि ते दोघे दरीत पडतात. यावेळी त्यांची बाईकदेखील दरीत कोसळते. (Passengers on a Scooty rescued in a bus accident But bike coming from behind directly in the valley Shocking video) हे ही वाचा-ड्रायव्हरच्या एका मागोमाग एक लगावल्या कानशिलात; तरुणीचा तांडव बघून पोलीस हादरले या घाट रस्त्यावर सुरक्षेसाठी कोणतीच सुविधा करण्यात आली नाही. सुरक्षेसाठी छोटी भिंत वा लोखंडी कुंपण घालण्यात आलेले नाही. या अपघातात दोन्ही दुचाकी स्वार आणि त्यांच्या मागे बसलेल्या व्यक्ती जखमी झाल्या आहे. येत्या 15 दिवसात येथे सुरक्षेची सोय करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.  
  Published by:Meenal Gangurde
  First published: