मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आपोआप चालू लागली पार्किंगमधील बाईक; Horror film मधील नाही हा रिअल Shocking video

आपोआप चालू लागली पार्किंगमधील बाईक; Horror film मधील नाही हा रिअल Shocking video

बाईकचा हा VIDEO पाहाल तर तुमचा डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. तुम्हाला घामच फुटेल.

बाईकचा हा VIDEO पाहाल तर तुमचा डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. तुम्हाला घामच फुटेल.

बाईकचा हा VIDEO पाहाल तर तुमचा डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. तुम्हाला घामच फुटेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 04 फेब्रुवारी : चालकाशिवायच गाडी चालत असल्याचे सीन तुम्ही हॉरर फिल्ममध्ये पाहिलेच असतील. पण प्रत्यक्षात असं कधी पाहिलं आहे. नाही ना? मग आता तुमचं हृदय घट्ट करा आणि सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा व्हिडीओ (Viral Video) पाहा. ज्यामध्ये तुम्हाला असं दृश्यं दिसणार आहे, जे तुम्हाला एखाद्या हॉरर फिल्ममधील वाटेल पण ते रिअल आहे.

सोशल मीडियावर बाईकचा एक असा व्हिडीओ (Bike video) व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही शॉक व्हाल. तुमच्या अंगावरच काटा येईल. हा शॉकिंग व्हिडीओ (Shocking Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

बाईक म्हणजे की आणि किकवर चालणारी. पण हे करायला एखादा माणूस तर लागतो. पण या व्हिडीओत दिसणारी बाईक माणसाशिवायच आपोआप सुरू झाली (Parked Motorcycle Apparently Moving On Its Own). व्हिडीओत पाहू शकता, रस्त्यावर पार्किंगमध्ये काही बाईक आहे. तिथं एकही माणूस नाही. काही वेळात एक बाईक आपोआप सुरू होते आणि ती चालू लागते. बाईक सुरू होऊ टर्न घेते आणि अंतर चालतेही आणि नंतर ती जमिनीवर कोसळते.

हे वाचा - ना युक्ती ना शक्ती; तरी मगरीच्या तावडीतून वाचला झेब्रा; कसं ते तुम्हीच पाहा

ही घटना सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमधील तारखेनुसार ही घटना डिसेंबर 2020 मधील आहे. पण आता त्याचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यानंदेखील कॅमेऱ्यात कैद झालं नाहीतर विश्वासच बसला नसता, असं कॅप्शन दिलं आहे.

हे वाचा - उत्खननात आढळली सोन्याची जीभ असणारी ममी; यामागे नेमकं कारण काय?

हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला. व्हिडीओ पाहूनही आपला यावर विश्वास बसत नाही आहे असं म्हटलं आहे. यावर संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत. खरंच ही पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी आहे? स्मार्ट एडिटिंग आहे की बाईकमध्ये काही बिघाड असे बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत.

First published:

Tags: Social media viral, Viral, Viral videos