Vodafone नेटवर्कवर चिडले परेश रावल; Twitter वर रंगला Vodafone, Jio, Airtel चा बाजार

Vodafone नेटवर्कवर चिडले परेश रावल; Twitter वर रंगला Vodafone, Jio, Airtel चा बाजार

मोबाईल नेटवर्क मिळत नाहीये? 'बाबूभैया'नी काय केलं पाहा - Twitter वर मोबाईल कंपन्यांची 'हेराफेरी'

  • Share this:

मुंबई, 31 डिसेंबर : मोबाईल नेटवर्क मिळत नाहीये? 'बाबूभैया'नी काय केलं पाहा - Twitter वर मोबाईल कंपन्यांची 'हेराफेरी'ची गोष्ट.

कॉल ड्रॉप होणं, नेटवर्क न मिळणं या नेहमीच्या समस्या आहेत ना? आता यावरच वैतागून अभिनेते परेश रावल यांनी एक Tweet केलं आणि त्यावर सुरू झाली Airtel, Jio, Vodafone यांची 'हेराफेरी'. नेमकं काय घडलं वाचा.

सोशल मीडियावर सगळीकडे न्यू इअरचा ट्रेंड सुरू असतानाच अभिनेते परेश रावल यांच्या एका Tweet ने Twitter वर मोबाईल कंपन्यांची वेगळीच रस्सीखेच सुरू झाली.  Vodaphone is a lousy network and shameless too ! असं परेश रावल यांनी वैतागून लिहिलं. त्यावर अनेक यूजर्सनी या कंपनीला आणि इतरही मोबाईल कंपन्यांना टॅग करत त्यांचे अनुभव शेअर केले. त्याची पहिली दखल घेतली Jio ने. तुम्ही आमच्याकडे या. आम्ही चांगली सर्व्हिस देऊ असं आमंत्रणच त्यांची कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह काजलने परेश रावल यांना टॅग करत Tweet केलं.

Vodafone ने मग तातडीने या Twitter थ्रेडची दखल घेतली. परेश रावल त्यांच्या अरुणा नावाच्या प्रतिनिधीने आम्ही लवकरात लवकर तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असं सांगितलं. Airtel नेही या मोबाईल कंपन्यांच्या Twitter बाजारात उडी घेतली.  आम्ही चांगली सेवा देऊ, आमच्याकडे या असं सांगण्याचा सपाटाच लागला.

अनेक यूजर्सनी मग कंपन्यांच्या अधिकृत हँडल्सवरून दखल घेतली जात आहे हे पाहून आपापले मोबाईल नेटवर्कचे प्रश्न शेअर केले. अनेकांना या मोबाईल कंपन्यांनी उत्तरं दिली.

न्यू इअरचा ट्रेंड सुरू असताना Twitter वर बाबूभैयांच्या एका Tweet ने वेगळीच हेराफेरी पाहायला मिळाली.

--

अन्य बातम्या

दानवेंनी केला जावयाचा राजकीय घात, हर्षवर्धन जाधवांनी सासऱ्यांवर केले गंभीर आरोप

दलित समाजासाठी भीमा कोरेगाव का आहे अस्मितेचं प्रतिक? असा 'विजय दिना'चा इतिहास

...जेव्हा गायिका सुनिधी चौहानचा मुलगा तिला गाण्यात साथ देतो, पाहा VIRAL VIDEO

रेल्वे स्टेशनवरील तरुणाच्या गाण्याने रानू मंडललाही टाकलं मागे, VIDEO VIRAL

हेही पाहा - भारी ना राव! प्रिया प्रकाश वॉरियरने पुन्हा मारला डोळा, सोशल मीडियावर VIDEOने दंग

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 31, 2019, 9:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या