Home /News /viral /

Honeymoon Trip चं गिफ्ट पडलं भारी; हनीमून सोडून पळालं कपल कारण...

Honeymoon Trip चं गिफ्ट पडलं भारी; हनीमून सोडून पळालं कपल कारण...

एका नवविवाहित कपलने आपल्या हनीमूनचा विचित्र अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे.

    मुंबई, 16 मे : लग्नानंतर काही क्षण एकत्र, एकांतात घालवावे असं प्रत्येक कपलला वाटतं. त्यासाठीच लग्न होताच एखाद्या रोमँटिक ठिकाणी कपल हनीमूनला जातात. काही कपलला त्यांच्या लग्नाचं गिफ्ट म्हणून त्यांना हनीमून ट्रिपचं पॅकेज मिळतं. पण असं गिफ्ट एका कपलला चांगलंच महागात पडलं आहे. शेवटी या कपलला हनीमून सोडून पळण्याची वेळ आली. एका कपलने आपल्या हनीमूनचा अनुभव रेडिट या सोशल मीडिया साइटवर शेअर केला आहे. लग्नानंतर मुलाच्या आईवडिलांनीच आपल्या लेकाला आणि सुनेला हनीमूनचं पॅकेज गिफ्ट केलं. एक आठवड्याचं हे हनीमून पॅकेज होतं. ते पाहून कपलला खूप आनंद झाला. पण या गिफ्टसोबत एक अटही होती. कपलच्या हनीमून ट्रिपमध्ये तेसुद्धा येणार होते. ही अट कपलने मान्य केली. आई-वडिलांना घेऊन हे कपल हनीमूनला गेलं. पण काही दिवसांतच नवविवाहित कपलने हनीमून सोडून आधी पळ काढला. आई-वडिलांना हॉटेलमध्येच ठेवून हे कपल त्यांच्यापासून दूर निघून गेलं आणि याचं कारण आई-वडिलच होतं. हे वाचा - VIDEO- उतावळ्या नवऱ्याने मंडपातच नवरीबाईला...; बिच्चारीला शेवटी लपवावं लागलं तोंड एकतर आधीच हे आईवडिल आपल्या मुलांच्या हनीमूनला आले. त्यात या कपलला एकांतच देत नव्हते. दररोज सकाळी 6 वाजताच कपलच्या हॉटेलमधील खोलीचा दरवाजा ठोकवून त्यांना उठवायचे. एकत्र ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करायचे. कित्येक वेळा कपलने आपल्यासाठी एकांत मागितला. त्यावेळी पालकांनी तो हॉटेलमध्ये घालवा असं उत्तर दिलं.  मुलानेही आपल्या आई-वडिलांसमोर याबाबत मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. तेव्हा हनीमूनसाठी त्यांनी पैसे दिल्याचं सांगितलं. हे वाचा - PUBG खेळताना दोघांच्या प्रेमात पडली तरुणी; दोघंही सोबतच भेटण्यासाठी पोहोचले अन्... हनीमूनला या कपलला प्रायव्हेसी मिळत नव्हती. प्रत्येक वेळी त्यांचे पालक त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे कपल वैतागलं होतं.  शेवटी वैतागलेल्या कपलने त्या हॉटेलमधूनच पळ काढला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Relationship, Viral

    पुढील बातम्या