...आणि अजिबात चालता न येणारा कुत्रा धावू लागला, भावुक करणारा VIDEO VIRAL

...आणि अजिबात चालता न येणारा कुत्रा धावू लागला, भावुक करणारा VIDEO VIRAL

आपल्या आवडत्या प्राण्याला जरा सुद्धा काही झाले तरी त्याचा मालक त्यांना सोडून न देता त्याची देखभाल करतो. त्या आजारातून त्या प्राण्याला बरं करण्याचा प्रयत्न करतो. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 05 फेब्रुवारी: प्राण्यांबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम आणि दयाळूपणा असतोच. म्हणतात ना प्राण्यांवर एकदा प्रेम केले तर ते आपल्याला आयुष्यभर साथ देतात. त्याचप्रमाणे आपल्या आवडत्या प्राण्याला जरा सुद्धा काही झाले तरी त्याचा मालक त्यांना सोडून न देता त्याची देखभाल करतो. त्या आजारातून त्या प्राण्याला बरं करण्याचा प्रयत्न करतो. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अजिबात चालता न येणाऱ्या कुत्र्याचा (Paralyzed dog) बरा होण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ सर्वांची मनं जिंकत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

जवळपास एका मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये बिलकूल चालता न येणारा कुत्रा मेहनत केल्यानंतर कसा चालू लागतो हे दाखवले आहे. सतत व्यायाम, मसाज आणि दृढनिश्चयाच्या जोरावर हा कुत्रा ठणठणीत बरा झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला या कुत्र्याला चालता येत नसल्याने एक महिला त्याच्या कमरेला पट्टा बांधून कार्पेटवरुन त्याला चालवण्याचा प्रयत्न करत आहे, असं दाखवलं आहे. तसंच फिटनेस बॉलच्या सहाय्याने त्याच्याकडून व्यायाम करुन घेण्याचा प्रयत्न देखील करून घेतला जात आहे.

(हे वाचा-मैथिली ठाकूरच्या गळ्यातून उमटले हे सुरांनो चंद्र व्हा, मिनिटात video व्हायरल)

तसंच, ही महिला कुत्र्याच्या पायांना सतत मसाज करताना देखील दिसत आहे. त्याला खायला देताना सुद्धा ती त्याच्याकडून हालचाल करुन घेते जेणेकरुन तो चालावा. तिने कुत्रा चालावा यासाठी खूप मेहनत घेतली असून अखेर तिच्या मेहनतीला यश येते आणि कुत्रा व्यवस्थित चालू लागतो. व्हिडीओच्या शेवटी कुत्रा कसल्याही मदतीशिवाय गार्डनमध्ये चालू आणि पळू लागत असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ अमेरिकेचा माजी बास्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन 2 फेब्रुवारीला शेअर केला आहे. हा व्हिडीओ ट्वीट करत त्यांनी कॅप्शनमध्ये या महिलेने जादू केली असल्याचे म्हटले आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स भावून झाले असून त्यांनी व्हिडीओतील महिलेचे आणि तिच्या मेहनतीचे खूप कौतुक केले आहे.

एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करत महिलेला 'पृथ्वीवरील देवदूत' म्हटले आहे तसंच जगातील सर्व डॉक्टर आणि थेरेपिस्टने तिच्यासाठी टाळ्या वाजवाव्या असे आवाहन केले आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 5, 2021, 12:57 PM IST

ताज्या बातम्या