Home /News /viral /

अरारारा खतरनाक! 'पापा की परी'चं थरारक करतब; VIDEO पाहून भल्याभल्यांची हवा टाइट

अरारारा खतरनाक! 'पापा की परी'चं थरारक करतब; VIDEO पाहून भल्याभल्यांची हवा टाइट

मुलींनी रस्त्यावर असा स्टंट केला की पाहूनच तुम्ही तोंडात बोटं घालाल.

  मुंबई, 19 एप्रिल : मुली सर्वात जास्त लाडक्या असतात त्या वडिलांच्या म्हणूनच त्यांना पापा की परी म्हटलं जातं. त्यामुळे मुलींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले की शक्यतो त्यावर पापा की परी म्हणून कमेंट केल्या जातात. बहुतेक वेळा तर कौतुकाने नव्हे तर खिल्ली उडवत त्यांना पापा की परी म्हटलं जातं आणि अशाच लोकांची बोलती कायमची बंद करणाऱ्या मुलींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या मुलींनी जे केलं ते पाहून भल्याभल्यांची हवा टाइट झाली आहे (Girl stunt video viral). स्टंट म्हटलं की सामान्यपणे तरुणच पटाईत असतात असं अनेकांना वाटतं. पण दोन मुलींचा खतरनाक स्टंट पाहून तर तरुणांनाही लाज वाटेल. मुलींनी असं थरारक करतब करून दाखवलं आहे जे कदाचित स्वतःला स्टंटबाज म्हणवणाऱ्या आणि स्टंट करणाऱ्या कित्येक तरुण मुलांच्याही आवाक्याबाहेरचं असावं. व्हिडीओ पाहूनच तोंडात बोटं घालाल. काळजाचं ठोका चुकवणारं असं हे दृश्य आहे. आता असं नेमकं या व्हिडीओत काय आहे हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. हे वाचा - चमत्कार की नशीब! बंदुकीची गोळी आरपार झाली तरी जवानाला काहीच झालं नाही; Ukrainian Soldier चा Shocking Video व्हिडीओत पाहू शकता तीन मुली दिसत आहेत. यातील दोन मुली तरुण आहेत तर एक मुलगी लहान आहे. एक तरुण मुलगी जमिनीवर गुडघ्यावर बसलेली दिसते आहे. तिने हातात कॅमेऱ्याच्या ट्रायपॉडसारखी एक वस्तू धरली आहे. तिच्यामागे लहान मुलगी उभी आहे.
  सुरुवातीला लहान मुलगी त्या तरुणीच्या पाठीवर चढते आणि ट्रायपॉडचं सर्वात वरील लाल टोक आपल्या तोंडात धरते आणि ब्लॅक फ्लिक मारून त्याच स्थितीत राहते. त्यानंतर खालील तरुणीही अगदी तिच्यासारखंच करते. हे पाहूनच आपल्या काळजाचा ठोका चुकतो. पण त्या इथवरच थांबत नाही. पुढे जे काही करतात ते पाहण्यासाठी आधी तुमचं हृदय किंवा मन घट्ट करा. या दोन्ही मुली ज्या स्थितीत आहेत त्याच स्थितीत गरागरा फिरताना दिसतात. त्यांना पाहूनच अक्षरशः धडकी भरते. हे वाचा - कुस्ती पाहण्यासाठी आलेली तरुणीच आखाड्यात उतरली; पैलवानांची केली जबर धुलाई, Video Viral व्हिडीओ पाहून जी अवस्था तुमची झाली तशीच अवस्था सर्वांची झाली आहे. काही युझर्सनी हे कुणीच घरी ट्राय करू नये, नाहीतर रुग्णालयात जाल, असा सल्ला दिला आहे. तर एका युझरने या मुलींना अद्भुत म्हटलं आहे. या मुली या ग्रहावरील नाहीच असा दावा या युझरने केला आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या