वडिलांनी सायकल घेऊन दिली नाही म्हणून 8 वीच्या मुलानं असा केला जुगाड, पाहा VIDEO

वडिलांनी सायकल घेऊन दिली नाही म्हणून 8 वीच्या मुलानं असा केला जुगाड, पाहा VIDEO

कोरोनाच्या काळात नवीन सायकल घेणं शक्य नसल्यानं वडिलांनी आपल्या मुलाच्या मदतीनं हा भन्नाट जुगाड केला आहे.

  • Share this:

लुधियाना, 25 ऑगस्ट : देशात कोरोनाचं संकट असल्यानं मुलाला सायकल देणं शक्य दिलं नाही. पंजाबमधील लुधियाना येथे एका घरी बसून वडिलांनी जुगाडवरून आपल्या मुलासाठी दुचाकीसारखी सायकल तयार केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपल्या मुलाला नवीन सायकल घेता आली नाही म्हणून वडील आणि 8वीत असणाऱ्या मुलानंही वडिलांना ही सायकल तयार करताना मदत केली आहे.

लुधियानामधल्या लखोवल गावातील ही घटना आहे. इयत्ता 8 वीच्या वर्गात शिकणाऱ्या हरमनजोतच्या वडिलांनी स्कूटरसारखी सायकल तयार केली आहे. हा नवीन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-बापरे! एसीतून हवा नाही तर आला साप...अन् केली उंदाची शिकार, पाहा थरारक VIDEO

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की सायकलचा पुढचा लूक स्कूटरसारखा आहे आणि मागे सायकलचं चाक लावण्यात आलं आहे. सायकलचं पॅंडल मारून हे चालवायला लागतं. समोरून स्कूटरसारखी दिसणारी ही सायकल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोरोनाच्या काळात नवीन सायकल घेणं शक्य नसल्यानं वडिलांनी आपल्या मुलाच्या मदतीनं हा भन्नाट जुगाड केला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 25, 2020, 12:27 PM IST

ताज्या बातम्या