मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - चर्चा तर होणारच! म्हशीने दिला अशा रेडकाला जन्म की तुमचीही हटणार नाही नजर

VIDEO - चर्चा तर होणारच! म्हशीने दिला अशा रेडकाला जन्म की तुमचीही हटणार नाही नजर

म्हैस आणि तिचं रेडकू चर्चेत. (प्रतीकात्मक फोटो)

म्हैस आणि तिचं रेडकू चर्चेत. (प्रतीकात्मक फोटो)

म्हशीच्या रेडकाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Palghar, India
  • Published by:  Priya Lad

राहुल पाटील/पालघर, 03 ऑक्टोबर : सामान्यपणे म्हैस म्हटली की काळी कुळकुळीत. अशी काळीकुट्ट म्हैसच आपल्यासमोर येतं. तिचं रेडकू म्हटलं तर तेसुद्धा तिच्यासारखंच काळं. पण सध्या अशा म्हैस आणि रेडकूचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यांना पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. म्हशीने अशा रेडकाला जन्म दिला आहे की त्यांचीच सर्वत्र चर्चा होते आहे. त्यांच्यावरून तुमचीही नजर हटणार नाही.

पालघर जिल्ह्यातील टाकवहाल गावातील म्हैस आणि तिचं रेडकू चर्चेत आलं आहे. इथं राहणारे समीर पटेल यांची ही म्हैस आणि रेडकू. यांना पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. हे रेडकू अनेकांसाठी कुतूहलाचा विषय बनलं आहे . याचं कारण म्हणजे त्यांचा रंग.

जसं आपण मघाशी म्हटलं काळ्या म्हशीचं रेडकूही तिच्यासारखंच काळं असतं.  पण कधी काळ्याकुट्ट म्हशीचं पांढरंशुभ्र रेडकू पाहिलं आहे का? नाही ना? तुम्हाला वाटेल आम्ही मस्करी करत आहोत. तुमचा यावर विश्वासच बसणार नाही. पण हे खरं आहे. प्रत्यक्षात काळ्या म्हशीने पांढऱ्या रेडकूला जन्म दिला आहे.

हे वाचा - आश्चर्य! म्हशीच्या पोटी जन्माला आलं 4 डोळ्यांचं रेडकू; विचित्र पिल्लाला पाहून डॉक्टर म्हणाले, 'असे प्राणी...'

समीर यांचा शेतीपूरक दुग्धव्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते हाच व्यवसाय करतात. मात्र म्हशीला पांढरं शुभ्र रेडकू जन्मल्याचं त्यांच्या अनुभवातील ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे, असं त्यांनी सांगितलं.

तज्ज्ञांच्या मते, ही घटना दुर्मिळ आहे. याला शास्त्रीय भाषेत अल्बिनिजम म्हटलं जातं. मेलानिनच्या कमतरतेचा हा परिणाम आहे.

हे वाचा - तुम्हाला डुक्कर आवडत नसले तरी त्यांच्याबद्दलचे हे Facts तुम्हाला आश्चर्यचकित करतील

माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही मेलानिन असतं, ज्यावर शरीर त्वचा, डोळे, केस यांचा रंग अवलंबून असतो.  शरीराचा रंग ठरवणाऱ्या या मेलानिनची कमतरता आनुवंशिक गुणसूत्रांमुळे होते. याच रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे रेडकूच्या डोळ्यांचा, त्वचेचा आणि केसांचा रंग पांढराशुभ्र होतो.

First published:

Tags: Pet animal, Viral, Viral videos