मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कधी कोपरानं तोडले अक्रोड, तर डोक्यानं टरबूज! वर्ल्ड रेकॉर्ड बनवूनही पाकिस्तानी खेळाडूचं ट्रोलिंग

कधी कोपरानं तोडले अक्रोड, तर डोक्यानं टरबूज! वर्ल्ड रेकॉर्ड बनवूनही पाकिस्तानी खेळाडूचं ट्रोलिंग

एका पाकिस्तानी खेळाडूनं नवा विश्वविक्रम रचला. मात्र त्याचं कौतुक होण्याऐवजी सध्या तो ट्रोल होताना दिसत आहे.

एका पाकिस्तानी खेळाडूनं नवा विश्वविक्रम रचला. मात्र त्याचं कौतुक होण्याऐवजी सध्या तो ट्रोल होताना दिसत आहे.

एका पाकिस्तानी खेळाडूनं नवा विश्वविक्रम रचला. मात्र त्याचं कौतुक होण्याऐवजी सध्या तो ट्रोल होताना दिसत आहे.

  • Published by:  desk news

लाहौर, 20 डिसेंबर: आपल्या वेगवेगळ्या कलांचं (Various martial arts) प्रदर्शन करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guianese Book Of World Record) विक्रम नोंदवलेल्या पाकिस्तानी खेळाडूवर (Pakistani Player) सध्या सोशळ मीडियातून जोरदार टीका (Trolled in Social Media) होत आहे. पाकिस्तानी नागरिक आपला सगळा राग या गुणी खेळाडूवर काढत असून त्याने आपल्या देशाची शान उंचावण्याऐवजी कमी केल्याची टीका करत आहेत. नागरिक जेव्हा निराशेत असतात, तेव्हा त्यांना कुठल्याच गोष्टीचं कौतुक वाटत नाही. सतत पराभूत झाल्याच्या मानसिकतेतून जगाकडं आणि स्वतःच्या देशातील खेळाडूंकडं पाहणाऱ्या नागरिकांचा दृष्टीकोन कसा होऊ शकतो, ते या खेळाडूला ज्या प्रकारे पाकिस्तानी नागरिक ट्रोल करतायत, त्यावरून दिसून येतं.

खेळाडूचं रचला विश्वविक्रम

व्हिडिओत दिसणाऱ्या खेळाडूचं नाव आहे मोहम्मद राशिद. तो एक पाकिस्तानी नागरिक असून मार्शल आर्ट प्लेअरदेखील आहे. नुकताच सोशल मीडियावर एका व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यात मोहम्मदने आपल्या कोपरानं अक्रोड फोडण्याचा विश्वविक्रम केला आहे. एका टेबलवर मांडून ठेवलेले अक्रोड आपल्या कोपराने एकामागून एक तो फोडत चालल्याचं दिसतं. ज्या वेगाने तो हे अक्रोड फोडतो, ते पाहून प्रत्येकालाच आश्चर्य वाटतं. अक्रोड फोडत असताना त्याची एकाग्रता, तल्लीनता आणि वेग या गोष्टी भारावून टाकणाऱ्या आहेत. मात्र पाकिस्तानमधील नागरिकांना मात्र त्याचं कौतुक वाटत नसून ते त्याला ट्रोल करत आहेत.

हे वाचा- विध्वंस! राय चक्रीवादळात तब्बल 208 जणांचा मृत्यू, अन्नपाण्यासाठी लोकांचा संघर्ष

हे कसलं रेकॉर्ड?

एकीकडे भारताला मिस युनिव्हर्सचा बहुमान मिळत असताना आपण मात्र अक्रोड फोडणे, कलिंगड फोडणे असल्या फुटकळ गोष्टीत रेकॉर्ड बनवत असल्याचं शल्य काही नागरिकांनी सोशल मीडियावरून व्यक्त केलं आहे. वास्तविक, मोहम्मदनं एका मिनिटात 315 अक्रोड फोडण्याचा विक्रम रचला आहे. यापूर्वी तीनवेळा म्हणजेच 2015, 2018 आणि 2019 सालीदेखील मोहम्मदनेच हा विक्रम आपल्या नावे केला होता. तर 2017 साली ड्रिंक्सने भरलेले 77 ऍल्युमिनिअम कॅन एका मिनिटात आपल्या कोपरानं फोडून टाकले होते, तर 2018 साली एका मिनिटात 49 टरबूज डोक्यानं फोडण्याचा विक्रम रचला होता.

First published:

Tags: Pakistan, Record, Viral video., World record