मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पाकिस्तानी संगीतकाराच्या खास गिफ्टने जिंकलं भारतीयांचं मन; राष्ट्रगीताचा अनोखा Video बघाच

पाकिस्तानी संगीतकाराच्या खास गिफ्टने जिंकलं भारतीयांचं मन; राष्ट्रगीताचा अनोखा Video बघाच

पाकिस्तानी कलाकार सियाल खान रबाब वाद्याच्या माध्यमातून भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ची धून वाजवताना दिसतात. (Pakistani Musician plays jana gana mana)

  • Published by:  Kiran Pharate
कराची 16 ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कसे आहेत, हे जगजाहीर आहे. मात्र, आता पाकिस्तानमधून एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो भारतीयांचं मन जिंकतोय. सोमवारी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी भारतात मोठ्या उत्साहारत स्वातंत्र्यदिन साजरा झाला. याच खास दिवशी पाकिस्तानमधील एका रबाब वादक कलाकाराने आपल्या भारतीय प्रेक्षकांना एक खास गिफ्ट दिलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरं प्रेम संपत नसतं, या आजोबांनी पुन्हा खरं करून दाखवलं, VIDEO च्या प्रेमात पडाल पाकिस्तानी कलाकार सियाल खान रबाब वाद्याच्या माध्यमातून भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ची धून वाजवताना दिसतात. रबाब हे वीणासारखे एक तंतुवाद्य आहे . हे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि काश्मीरमध्ये खूप लोकप्रिय आहे. सियाल यांनी खास अंदाजात भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर हजारो लोकांनी यावर कमेंट करून प्रतिक्रियाही दिल्या आहेत. भारतीयांसह पाकिस्तानी नागरिकांनीही सियाल यांचं कौतुक केलं आहे. व्हिडिओमध्ये सियाल अतिशय निसर्गरम्य ठिकाणी बसलेले दिसतात. त्यांच्या पाठीमागे उंच डोंगर आणि त्यावर पसरलेली हिरवी चादर दिसते. हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं 'सीमेपलीकडच्या माझ्या प्रेक्षकांसाठी भेट'. पुढे सियाल यांनी भारतातील जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आणि लिहिलं की 'दोन्ही देशांमधील चांगले संबंध, मैत्री आणि सद्भावना यासाठी मी भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याचा प्रयत्न केला आहे.'
First published:

Tags: Pakistan, Video viral

पुढील बातम्या