'आपण झोपलो की व्हायरस पण झोपतो'-पाकच्या नेत्याचं अजब वक्तव्य, VIDEO पाहून डोक्यावर हात माराल

'आपण झोपलो की व्हायरस पण झोपतो'-पाकच्या नेत्याचं अजब वक्तव्य, VIDEO पाहून डोक्यावर हात माराल

पाकिस्तानमधील नेते अनेकदा चुकीची वक्तव्य करत असतात आणि मग ते ट्रोलिंगची शिकार बनतात. असंच काहीसं या महाशयांबरोबर झाले आहे.

  • Share this:

18 जून  : पाकिस्तानचे एक राजकीय नेता फजल-उर-रहमान (Fazal-ur-Rehman) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.  सध्या या व्हायरल (Viral Video) वर अनेक मीम्स देखील बनू लागले आहे. कारण या नेत्याने कोरोनाशी लढण्यासाठी एक अजब उपाय सांगितला आहे. पाकिस्तानमधील नेते अनेकदा चुकीची वक्तव्य करत असतात आणि मग ते ट्रोलिंगची शिकार बनतात. असंच काहीसं या महाशयांबरोबर झाले आहे. काही रहमान यांना कोरोनाशी लढण्यासाठी झोपण्याचा सल्ला दिला आहे. ते या व्हिडीओमध्ये म्हणतात की, 'जेव्हा आपण झोपतो, तेव्हा व्हायरस देखील झोपतो'.

(हे वाचा-…आणि जवानांनी चक्क गाण्याच्या तालावर केलं ट्रेनिंग, हा भन्नाट VIDEO एकदा पाहाच)

नॅशनल असेम्बलीच्या या माजी सदस्याने एका सभेमध्ये असं सांगितलं की. 'जेवढे जाास्त आपण झोपतो, तेवढा जास्त हा व्हायरस झोपतो. आपण जेव्हा मरतो तेव्हा व्हायरस मरतो.' त्यांनी असा दावा देखील केला आहे की डॉक्टरांनी असा सल्ला त्यांना दिला आहे.

या व्हिडीओवर लोकांनी केलेल्या कमेंट्स देखील मजेदार आहेत

या कमेंटमध्ये या नेत्याचा एक डान्स करतानाचा व्हिडीओ देखील एका युजरने शेअर केला आहे आणि असा सवाल केला आहे की, 'जेव्हा आपण डान्स करतो तेव्हा व्हायरस पण डान्स करतो का?'

हा व्हिडीओ पाकिस्तानी पत्रकार असणाऱ्या नायला इनायत यांनी शेअर केला आहे. मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ ट्विटरवर पाहिला जात आहे आणि लोकांकडून त्यांची टेर देखील खेचली जात आहे. आतापर्यंत 36 हजारांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून, 500 पेक्षा जास्त रिट्वीट देखील या व्हिडीओला मिळाले आहेत.

First published: June 18, 2020, 3:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या