'ट्रम्पच माझे अब्बू', धक्कादायक खुलासा करणाऱ्या पाकिस्तानी तरुणीची VIDEO VIRAL

'ट्रम्पच माझे अब्बू', धक्कादायक खुलासा करणाऱ्या पाकिस्तानी तरुणीची VIDEO VIRAL

पाकिस्तानी तरुणी ट्रम्प हे माझे बाबा असल्याचा दावा करत आहे. हा व्हिडीओ खर तर दोन वर्षांपूर्वीचा आहे. मात्र आता निवडणूकांच्या काळात हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.

  • Share this:

कराची, 07 सप्टेंबर : अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणूकांची जोरदार तयारी सुरू आहे. सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचारात असताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका पाकिस्तानी तरुणी ट्रम्प हे माझे बाबा असल्याचा दावा करत आहे. हा व्हिडीओ खर तर दोन वर्षांपूर्वीचा आहे. मात्र आता निवडणूकांच्या काळात हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी तरुणी मीडियाशी बोलताना दिसत आहे. यात ट्रम्प माझे खरे वडील असून मला त्यांना भेटायचं आहे, असेही ती म्हणत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ही तरुणी म्हणत आहे की, "मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, मी डोनाल्ड ट्रम्प यांची खरी मुलगी आहे. मी एक मुस्लिम आहे आणि ब्रिटिशांसोबत जे लोकं येतात ते मला विचारतात की ही मुलगी इथं काय करत आहे. मला इस्लाम धर्म आवडतो. ट्रम्प नेहमी माझ्या आईला सांगायचे की, तू माझ्या मुलीची काळजी घेत नाही. जेव्हा माझे आई-वडील भांडले तेव्हा मला खूप वाईट वाटले. आता मला माझ्या वडिलांना भेटायचे आहे". सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ 2018मधील असल्याचे आता समोर आले आहे.

वाचा-कोरोनाच्या संकटात किम जोंग यांनी रचले जगाला हादरवणारे 3 प्लॅन

वाचा-UAEमध्ये राहणाऱ्या भारतीयाला लागला जॅकपॉट, एका रात्रीत झाला कोट्यधीश!

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणीला ट्रोल केले जात आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प नोव्हेंबरमध्ये होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीत व्यस्त आहेत. ट्रम्प यांचे तीन विवाह झाले असून पहिल्या दोन पत्नीकडून त्यांना घटस्फोटही मिळाला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 7, 2020, 12:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading