मराठी बातम्या /बातम्या /Viral /पाठवणीच्या वेळी लेक झाली भावूक, वडिलांनाही आलं भरून; VIDEO होतोय व्हायरल

पाठवणीच्या वेळी लेक झाली भावूक, वडिलांनाही आलं भरून; VIDEO होतोय व्हायरल

लग्नाच्या वेळी कमालीची भावूक झालेली तरुणी आणि डोळे पाणावलेले (Pakistani girl and her father gets emotional while saying good buy to each other) तिचे वडील यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लाहौर, 28 नोव्हेंबर: लग्नाच्या वेळी कमालीची भावूक झालेली तरुणी आणि डोळे पाणावलेले (Pakistani girl and her father gets emotional while saying good buy to each other) तिचे वडील यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या मुलीचं लग्न (Marriage of daughter) हा खरं तर कुठल्याही वडिलांसाठी अतिशय भावूक क्षण असतो. लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी यावेळी फेर धरून (Memories in the past) नाचू लागतात आणि लेकीला निरोप देताना ऊर भरून येतो. आपल्या लेकीचं लग्न झाल्याचा आनंद आणि ती आपल्यापासून दुरावत असल्याची जाणीव या दोन्ही गोष्टींच्या संमिश्र भावना मनात निर्माण होत असतात.

स्टेजवरून जाताना भावूक

व्हिडिओत लग्न झालेली मुलगी आणि तिचा हात पकडून तिला स्टेजच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे घेऊन जाणारे वडील दिसतात. मुलीने आपल्या एका हातात एक फोटो पकडला आहे आणि दुसऱ्या हाताने तिने वडिलांना पकडलं आहे. आजूबाजूला बसलेली मंडळी या बापलेकीकडे पाहत आहेत.

वडील झाले भावूक

लग्न झाल्यानंतर लेकीची पाठवणी करतानाचा हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असल्याचं सांगितलं जात आहे. माहेर सोडून सासरी चाललेली लेक तर भावूक आहेच, मात्र तिच्यासोबत तिचे वडीलदेखील भावून झाले आहेत. वडिलांचे पाणावलेले डोळे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहेत.

हे वाचा- गर्भकळा सुरू झाल्यानंतर खासदार महिला सायकलवर पोहोचली रुग्णालयात

व्हिडिओ होतोय व्हायरल

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ लाईफस्टाईल नावाच्या हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. केवळ 7 सेकंदांच्या या व्हिडिओवर युजर्सकडून लाईक्सचा अक्षरशः पाऊल पडत आहे. अनेकांनी आपल्या स्वतःच्या लग्नाबाबातचे अनुभव शेअर केले आहेत. आपल्या वडिलांसोबत मुलींचं नातं किती घट्ट असतं, हेच या व्हिडिओतून समोर येत आहे. बापलेकीच्या नात्याची हळवी बाजू दाखवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

First published:
top videos

    Tags: Marriage, Pakistan, Videos viral