नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : आयपीएल 2020 च्या धर्तीवर पाकिस्तानमध्ये PSL ( पाकिस्तान प्रीमिअर लीग ) सुरू करण्यात आली आहे. मार्चमध्ये प्ले ऑफच्या आधी PSL कोरोनामुळे स्थगित करण्यात आली होती. मात्र शनिवारपासून ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या मुल्तान सुल्तान आणि कराची किंग्स क्वालिफायर एकमेकांविरुद्ध क्वालिफायर सामना खेळणार आहेत. तर, लाहोर आणि पेशावर जल्मी यांच्यात एलिमिनेटर सामना होईल.
मात्र दुसऱ्या सामन्यात एक मजेदार प्रसंग घडला. 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लाहोरनं चांगली सुरुवात केली. मात्र 12व्या ओव्हरमध्ये अचानक मोहम्मद इमरान पहिल्या चेंडूनंतर मॅच थांबवली आणि मोहम्मह हफिज धावत ड्रेसिंग रुमच्या दिशेनं गेला. दरम्यान हाफिज मैदान सोडून गेला तेव्हा नक्की काय झालं हे कोणालाच कळलं नाही. मात्र त्यानंतर हाफिज टॉयलेटला गेल्याचे समोर आले.
वाचा-डेव्हिड वॉर्नरसोबतच्या सेक्स लाईफबद्दल बोलली पत्नी कॅन्डिस
Imam, Shoaib, Wahab and Ramiz walk onto a cricket pitch...
Enjoy your all-access pass to the #HBLPSLV with HBL Parvaz#PhirSeTayyarHain #HBLPSLV #PZvLQ pic.twitter.com/yFVxaTajwL
— PakistanSuperLeague (@thePSLt20) November 14, 2020
वाचा-विराट कोहली केलेल्या अपीलमुळे पुरता फसला; ट्रोलर्सनी पत्नी अनुष्कालाही सुनावलं
पेशावर संघाकडून वहाब रियाज, इमाम उल हक आणि शोएब एकमेकांशी बोलत असताना स्पायडर कॅमऱ्यानं त्यांना थांबवले आणि कॉमेंटेटर रमीज रियाज यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
वाचा-IPL च्या टीम वाढवायची BCCI ची तयारी, पण फ्रॅन्चायजीपुढे या अडचणी
त्यावेळी इमामने सांगितले की फलंदाजी करताना हाफिजला अचानक धावत टॉयलेटला जावे लागले. मात्र हाफिजनं मैदानात येतात जोरदार फलंदाी सुरू केली. त्यानं नाबाद 74 धावा करत आपल्या संघाला 5 विकेटनं विजय मिळवून दिला.